वर जा

जिल्हा पुरस्कार योजना

  • परिचय
  • पात्रता निकष
  • सांख्यिकी
  • सूचना

परिचय

लघुउद्योग सुरू करणाऱ्या उद्योजकांना प्रोत्साहन मिळावे व त्यांनी संपादन केलेल्या प्रथित यशाची साभार पोच द्यावी, या हेतूने राज्य सरकारतर्फे जिल्हा पातळीवर जिल्हा पुरस्कार योजना १९८५ साली सुरू करण्यात आली. कमित कमी ३ वर्ष नोंदणी झालेला आणि सलग दोन वर्ष उत्पादन करीत असलेल्या घटकाचा मालक/ भागीदार/संचालक जिल्हा पुरस्कारासाठी पात्र ठरू शकतो. पुरस्कारासाठी उद्योजकाची निवड जिल्हा स्तरावर जिल्हा सल्लागार समिती करते. पुरस्कारासाठी उद्योजकांची निवड, विकासाचा वेग, तंत्रज्ञानाचा वापर, स्वावलंबन घटकाचे स्थान, उत्पादन विकास व गुणवत्ता नियंत्रण आयात, निर्यात उत्पादनातील बदल, व्यवस्थापन इ. निकषावर केली जाते. मागासवर्ग/अनुसूचित जाती जमातीच्या उद्योजकांना निवडीसाठी अतिरिक्त गुण दिले जातात. प्रथम पुरस्कार रोख ₹ १५०००/-, गौरव चिन्ह व द्वितीय पुरस्कार ₹ १००००/-, गौरव चिन्ह देवून पुरस्कारीत करण्यात येते

शासन निर्णय क्र. लउधो-२०१३/प्र.क्र.२०२/उद्योग-७, दिनांक २७ जानेवारी २०१५ अन्वये सन२०१५ पासून सदर पुरस्कार सोहळा दरवर्षी “विश्वकर्मा जयंती दिनी” उद्योग दिवस म्हणून साजरा करण्यात येईल. या दिवशी खाली स्वरूपात कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येईल:

  1. उद्योजकांची उत्पादने दृष्य स्वरूपात मांडणी व विक्रीसाठी प्रदर्शने भरविणे.
  2. उद्योग दिवसाच्या सोहळयात जिल्हा उद्योग केंद्रामार्फत कार्यशाळा व चर्चासत्र आयोजित करणे.
  3. उद्योग क्षेत्रात उल्लेखनीय / विशेष कामगिरी करणाऱ्या सुक्ष्म, लघु व मध्यम उद्योजकांना शासन निर्णय क्र. लउधो-२००५/(८३९२)/उद्योग-७, दिनांक १८ सप्टेंबर २००६ अन्वये देण्यात येणारा जिल्हा लघु उद्योग पुरस्कार सोहळा यापुढे दरवर्षी उद्योग दिनी साजरा करण्यात येईल.

पात्रता निकष

कमित कमी मागील ३ वर्ष नोंदणी झालेला, वित्तीय संस्थेचा थकबाकीदार नसलेला आणि सलग दोन वर्ष उत्पादन करीत असलेल्या घटकाचा मालक/ भागीदार/संचालक जिल्हा पुरस्कारासाठी पात्र ठरू शकतो.

सांख्यिकी

सर्व साधारण (₹ लाखात)
वर्ष नियतव्यय तरतुद खर्च
२०१०-११ १०.२० १०.२० १०.२०
२०११-१२ १०.२० १०.२० ९.१८
२०१२-१३ १०.२० १०.२० १०.२०
२०१३-१४ १०.२० १०.२० १०.२०
२०१४-१५ १०.२० १०.२० १०.२०
शासन निर्णय आणि सूचना
उदयोग दिवस साजरा करणेबाबत शा.नि. दि. - २७.०१.२०१५ तपशील पहा
जिल्हा पुरस्काराबाबत शा.नि. दि. १८.०९.२००६ तपशील पहा
उद्योग संचालनालय , महाराष्ट्र शासन यांच्या मालकीच्या सामग्री शेवटचा बदल: ११.०२.२०१६