वर जा

उद्योजकता विकास प्रशिक्षण कार्यक्रम (जिल्हा स्तरिय योजना अंतर्गत)

  • परिचय
  • पात्रता निकष
  • सांख्यिकी
  • सूचना
  • एफ.ए.क्यू

परिचय

सुशिक्षित बेरोजगारांना स्वयंरोजगारासाठी प्रवृत्त करण्याच्या दृष्टीने उद्योजकता प्रशिक्षण कार्यक्रम राबविला जातो. सदर प्रशिक्षण कार्यक्रमात मार्गदर्शक शिबिरे व प्रशिक्षण शिबिरे घेतली जातात. त्यामध्ये उद्योग / सेवा यांकरिता मार्गदर्शन देणे, जागेसंबंधी आवश्यक तरतूदी, प्रकल्प अहवाल तयार करणे, निरनिराळे परवाने मिळविण्याच्या पध्दती विक्रीकरिता आवश्यक बाबी इत्यादीबाबत उपयुक्त माहिती दिली जाते. या योजनेमध्ये महाराष्ट्र उद्योजकता विकास केंद्र, मिटकॉन व उद्योग संचालनालयाने मान्यता दिलेल्या अशासकीय कुशल प्रशिक्षक संस्थांमार्फत खालीलप्रमाणे प्रशिक्षण कार्यक्रम घेण्यांत येतात.

  • उद्योजकता परिचय कार्यक्रम (१ दिवसीय, अनिवासी)
  • एक दिवसाच्या परिचय कार्यक्रमात व्यवसायाची निवड, उद्योजकीय व्यक्तिमत्व विकास, व्यवसाय व्यवस्थापन, शासनाच्या विविध संस्था व अर्थसहाय्य देणा-या संस्था व यांच्यामार्फत राबविल्या जाणा-या योजनांची माहिती दिली जाते. प्रति प्रशिक्षण कार्यक्रम ₹ ६००/- खर्च राहिल.

  • उद्योजकता विकास प्रशिक्षण कार्यक्रम (१२ दिवसीय, निवासी)
  • सदर प्रशिक्षण कार्यक्रम १२ दिवसांचे, निवासी व भोजन व्यवस्थेसह आहे. उद्योजकता परिचय कार्यक्रमात निवडलेल्या प्रशिक्षणार्थ्यांना उद्योगाशी संबंधित कलागुणांचा विकास व माहिती मिळण्याचा प्रशिक्षणात प्रामुख्याने समावेश आहे. प्रति प्रशिक्षणार्थी ₹ ४०००/- संस्थेस देण्यांत येतात.

  • तांत्रिक प्रशिक्षण कार्यक्रम (१५ दिवस ते २ महिने अनिवासी)
  • या प्रशिक्षण कार्यक्रमात उत्पादन/सेवा उद्योगांशी निगडीत तांत्रिक प्रशिक्षण देण्यांत येते. हे प्रशिक्षण अनिवासी असून प्रशिक्षणार्थीस १५ दिवसांकरीता ₹. ५००/- आणि दरमहा ₹. १०००/- तसेच २ महिन्यांच्या प्रशिक्षण कार्यक्रमासाठी ₹.२,०००/- विद्यावेतन देण्यांत येते तसेच प्रति प्रशिक्षणार्थी प्रतिमहा ₹. ३०००/- संस्थेस देण्यांत येतात

पात्रता निकष

  • वयोमर्यादा १८ ते ४५ वर्ष
  • कमित कमी ७ वी पास
  • अर्जदार कोणत्याही वित्तीय संस्थेचा थकबाकीदार नसावा.

सांख्यिकी

सर्व साधारण (₹ लाखात)
वर्ष नियतव्यय तरतुद खर्च उद्दिष्ट साध्य
२०११-१२ ६३७.३० ६३७.३० ७१०.१४ २१२४३ २१९१
२०१२-१३ ६२६.७२ ८४९.९० ८६४.३२ २८३३० २४६०६
२०१३-१४ ६८५.३० ८९७.२९ ६८६.३२ २९९१० १९८३४
२०१४-१५ ७७६.७२ ७८७.७३ ७७९.०३ २६२५७ २२४७७

विशेष घटक योजना (₹ लाखात)
वर्ष नियतव्यय तरतुद खर्च उद्दिष्ट साध्य
२०११-१२ ४५६.९५ ४५६.९५ ४१०.८७ १५२३२ १२२६३
२०१२-१३ ६९७.०६ ६७१.७० ५९४.३५ २२३९३ १६४९२
२०१३-१४ ८२३.३० ८२३.३० ७०७.८९ २७४४३ १८३२७
२०१४-१५ ५९६.२० ५९६.२० ५९३.९२ १९८७३ १६३६२

आदिवासी उपयोजना (जनजाती क्षेत्रांतर्गत) (₹ लाखात)
वर्ष नियतव्यय तरतुद खर्च उद्दिष्ट साध्य
२०११-१२ १०.९० १०.९० ९.२३ ३६२ ३६६
२०१२-१३ १२.४५ १२.४५ २५.७३ ४१४ ३१९
२०१३-१४ २५.६० २५.६० २५.०८ ८५३ ६६३
२०१४-१५ २५.६० २५.६० २८.५८ ८५४ ९२६

आदिवासी उपयोजना (जनजाती क्षेत्राबाहेरील) (₹ लाखात)
वर्ष नियतव्यय तरतुद खर्च उद्दिष्ट साध्य
२०११-१२ ४.५५ ४.५५ ३.८७ १५
२०१२-१३ ५.५६ ५.५६ ४.९८ १७ २७
२०१३-१४ ६.३६ ६.३६ ६.२५ १६ २३
२०१४-१५ २३.८२ २३.८२ २३.८० ७९४ ७२१
शासन निर्णय आणि सूचना
उदयोजकता विकास प्रशिक्षण कार्यक्रम शा.नि. दि. २९.१०.२००७ तपशील पहा
उदयोजकता विकास प्रशिक्षण कार्यक्रम शा.नि. दि. ०७.०२.२००२ तपशील पहा

एफ.ए.क्यू - उद्योजकता विकास प्रशिक्षण कार्यक्रम

या योजनेचा लाभ घेण्‍यास कोण पात्र ठरतात? तसेच वयोमर्यादा व शैक्षणिक पात्रता काय राहील याबाबत मार्गदर्शन होईल का?

सदर योजनेअंतर्गत प्रशिक्षण घेण्यासाठी प्रशिक्षणार्थी किमान ७ वी पास असणे आवश्यक आहे. १८ ते ४५ वर्षया वयोगटातील व्यक्ती सदर योजने अंतर्गत प्रशिक्षणाचा लाभ घेऊ शकते. लाभार्थी कोणत्याही वित्तीय संस्थेचा थकबाकीदार नसावा.

या योजनेचा लाभ घेण्‍यासाठी अर्ज कोठे व कसा करावयाचा आहे? तसेच लाभार्थ्यांपर्यंत सदर योजना कशी पोहोचते?

या योजनेचा लाभ घेऊ इच्छिणाऱ्यांनी जिल्हास्तरावर जिल्हा उद्योग केंद्र कार्यालयाकडे संपर्क साधून प्रशिक्षण कार्यक्रमाबाबत माहिती घ्यावी. सदर कार्यक्रमांचे वेळापत्रक जिल्हास्तरावर जिल्हा उद्योग केंद्र कार्यालयाने ठरविल्याप्रमाणे घेण्यात येतात. सुशिक्षित बेरोजगारांना स्वयंरोजगारासाठी प्रवृत्त करण्याच्या दृष्टीने उद्योजकता प्रशिक्षण कार्यक्रम राबविला जातो. सदर प्रशिक्षण कार्यक्रमात मार्गदर्शक शिबिरे व प्रशिक्षण शिबिरे घेतली जातात. त्यामध्ये उद्योग / सेवा यांकरिता मार्गदर्शन देणे, जागेसंबंधी आवश्यक तरतूदी, प्रकल्प अहवाल तयार करणे, निरनिराळे परवाने मिळविण्याच्या पध्दती विक्रीकरिता आवश्यक बाबी इत्यादीबाबत उपयुक्त माहिती दिली जाते. या योजनेमध्ये महाराष्ट्र उद्योजकता विकास केंद्र, मिटकॉन व उद्योग संचालनालयाने मान्यता दिलेल्या अशासकीय कुशल प्रशिक्षक संस्थांमार्फत खालीलप्रमाणे प्रशिक्षण कार्यक्रम घेण्यांत येतात.

  • उद्योजकता परिचय कार्यक्रम (१ दिवसीय, अनिवासी)
  • एक दिवसाच्या परिचय कार्यक्रमात व्यवसायाची निवड, उद्योजकीय व्यक्तिमत्व विकास, व्यवसाय व्यवस्थापन, शासनाच्या विविध संस्था व अर्थसहाय्य देणा-या संस्था व यांच्यामार्फत राबविल्या जाणा-या योजनांची माहिती दिली जाते. प्रति प्रशिक्षण कार्यक्रम ₹ ६००/- खर्च राहिल.

  • उद्योजकता विकास प्रशिक्षण कार्यक्रम (१२ दिवसीय, निवासी)
  • सदर प्रशिक्षण कार्यक्रम १२ दिवसांचे, निवासी व भोजन व्यवस्थेसह आहे. उद्योजकता परिचय कार्यक्रमात निवडलेल्या प्रशिक्षणार्थ्यांना उद्योगाशी संबंधित कलागुणांचा विकास व माहिती मिळण्याचा प्रशिक्षणात प्रामुख्याने समावेश आहे. प्रति प्रशिक्षणार्थी ₹ ४०००/- संस्थेस देण्यांत येतात.

  • तांत्रिक प्रशिक्षण कार्यक्रम (१५ दिवस ते २ महिने अनिवासी)
  • या प्रशिक्षण कार्यक्रमात उत्पादन/सेवा उद्योगांशी निगडीत तांत्रिक प्रशिक्षण देण्यांत येते. हे प्रशिक्षण अनिवासी असून प्रशिक्षणार्थीस १५ दिवसांकरीता ₹. ५००/- आणि दरमहा ₹. १०००/- तसेच २ महिन्यांच्या प्रशिक्षण कार्यक्रमासाठी ₹.२,०००/- विद्यावेतन देण्यांत येते तसेच प्रति प्रशिक्षणार्थी प्रतिमहा ₹. ३०००/- संस्थेस देण्यांत येतात

उद्योग संचालनालय , महाराष्ट्र शासन यांच्या मालकीच्या सामग्री शेवटचा बदल: ११.०२.२०१६