वर जा

सूक्ष्म व लघु उपक्रम औद्योगिक समूह विकास कार्यक्रम (MSE-CDP)

  • परिचय
  • पात्रता निकष
  • सांख्यिकी
  • सूचना

परिचय

सुक्ष्म, लघु व मध्यम उपक्रमांच्या सर्वागिण विकासासाठी औद्योगिक समूह विकासाची संकल्पना केंद्र शासनाने स्वीकारली आहे. यास अनुसरुन केंद्र शासनाने औद्योगिक समूहांच्या विकासासाठी योजना जाहिर केल्या आहेत. उद्योग संचालनालय, मुंबई द्वारा सदर औद्योगिक समूह विकास योजनांची राज्यात प्रभावी अंमलबजावणी होणेसाठी औद्योगिक समूहांच्या विकासासाठी कार्यवाही करणेत येत आहे.

केंद्र शासनाच्या सुक्ष्म, लघु व मध्यम (MSME) मंत्रालयामार्फत सुक्ष्म व लघु उपक्रमासाठी सुधारीत सुक्ष्म, लघु उपक्रम- समुह विकास योजना (MSE-CDP) दिनांक १०/०२/२०१० रोजी घोषित केली आहे. सदर योजनेतुन सुक्ष्म व लघु उपक्रमाच्या सर्वांगीण विकास व वाढीकरीता क्षमतावृध्दी कार्यक्रम अंमलबजावणीसाठी तसेच सामायीक सुविधा निर्मितीसाठी अनुदान देण्यात येते. सामायिक सुविधा केंद्राअंतर्गत (सीएफसी) संशोधन व विकास केंद्र, पॅकेजिंग केंद्र चाचणी तसेच प्रशिक्षण केंद्र, सामाईक जलनिस्सारण केंद्र, सामाईक प्रक्रिया केंद्र इ. बाबीचा समावेश होतो.

सुधारीत योजनेची ठळक वैशिष्टये खालीलप्रमाणे:

  • सामायिक सुविधा केंद्राची प्रकल्प किंमत मर्यादा ₹ १० कोटी वरुन ₹ १५ कोटी पर्यंत वाढवलेली आहे. ज्यामध्ये केंद्र शासनाचा सहभाग ७०% ते ९०% इतका राहील.
  • पायाभूत सुविधांच्या विकासासाठी प्रकल्प किंमत मर्यादा ₹ १० कोटी असून ज्यामध्ये केंद्र शासनाचा सहभाग ६०% राहील.
  • क्षमतावृध्दी कार्यक्रमासाठीची प्रकल्प किंमत मर्यादा रु.१० लाख इतकी आहे. दिनांक २७.०७.२०१६ रोजीच्या सदर योजनेच्या सुधारीत मार्गदर्शक तत्वांनुसार केंद्र शासनामार्फत निदानोपयोगी अभ्यास अहवाल व क्षमतावृद्धी कार्यक्रमाच्या अंमलबजावणीसाठी यापुढे केंद्र शासनाचे अनुदान देण्यात येणार नाही. परंतू, प्रकल्पाचा सविस्तर प्रकल्प अहवाल मंजूर झाल्यानंतर रू.१०.00 लाख रक्कम विशेष हेतू वाहन संस्थेचे सहभाग वर्गणी म्हणून मान्य करण्यात येईल.
  • सामाईक सुविधा केंद्र आणि पायाभूत सुविधांच्या विकासासाठी तयार करावयाच्या विस्तृत प्रकल्प अहवालासाठीची किंमत मर्यादा ₹ ५.०० लाखापर्यंत अनुज्ञेय असेल.

सदर योजने अंतर्गत राज्यात एकूण पुढील नमूद ४२ औद्योगिक समूह प्रकल्प DSR अहवालाना केंद्र शासनाने मंजूरी दिली आहे. या अंतर्गत एकूण १६ प्रकल्प प्रस्तावांना अंतिम मंजूरी व ५ प्रकल्पांना तत्वत: मिळाली आहे.

सुक्ष्म लघु उपक्रम-समुह विकास कार्यक्रम अंतर्गत महाराष्ट्र राज्यातील सामायिक सुविधा केंद्र उभारणीसाठी अंतिम / तत्वत: मंजूरी प्राप्त प्रकल्प:-

क्र. क्लस्टरचे नाव ठिकाण
१. गारमेंट क्लस्टर विटा, सांगली
२. रेझीन क्लस्टर सांगली
३. फ्लाय ॲश क्लस्टर चंद्रपूर
४. टेक्स्टाईल क्लस्टर शिरपूर, धुळे
५. गारमेंट क्लस्टर नागपूर
६. इचलकरंजी टेक्स्टाईल क्लस्टर कोल्हापूर
७. टेक्स्टाईल क्लस्टर मालेगांव, नाशिक
८. दाल मिल क्लस्टर नागपूर
९. अहमदनगर ऑटो ॲन्ड इंजि. क्लस्टर अहमदनगर
१०. जनरल इंजिनिअरिंग ॲन्ड अलाईड क्लस्टर भोसरी, पुणे
११. मँगो प्रोसेसिंग क्लस्टर रत्नागिरी
१२. टर्मरिक क्लस्टर सांगली
१३. महासैनिक औद्योगिक इंडस्ट्रियल इस्टेट क्लस्टर पुणे
१४. कॉटन फॅब्रीक क्लस्टर हातकणगले, कोल्हापूर
१५. टेरीटॉवेल क्लस्टर सोलापूर
१६. टेक्सटाईल क्लस्टर नवापूर, नंदूरबार
17. इंजिनियरींग क्लस्टर याड्राव, जि. कोल्हापूर (तत्वत: मंजूरी)
18. राईस मिल क्लस्टर, रामटेक नागपूर (तत्वत: मंजूरी)
19. टेक्स्टाईल क्लस्टर, वेस्ट विदर्भ नागपूर (तत्वत: मंजूरी)
20. प्रिंटींग क्लस्टर औरंगाबाद (तत्वत: मंजूरी)
21. पैठणी साडी क्लस्टर येवला, नाशिक (तत्वत: मंजूरी)

सुक्ष्म लघु उपक्रम-समुह विकास कार्यक्रम अंतर्गत महाराष्ट्र राज्यातील मंजूरी प्राप्त निदानोपयोगी अभ्यास अहवाल प्रकल्प:-

क्र. क्लस्टरचे नाव ठिकाण
१. टेक्स्टाईल क्लस्टर इचलकरंजी, जि. कोल्हापूर
२. रेझिन मेकींग क्लस्टर मिरज, जि. सांगली
३. रेझिन मेकींग क्लस्टर नाशिक
४. फ़्लाय ॲश क्लस्टर चंद्रपूर
५. कोल्हापूरी चप्पल क्लस्टर कोल्हापूर
६. काजू प्रक्रिया क्लस्टर सिंधुदूर्ग
७. आंबा प्रक्रिया क्लस्टर रत्नागिरी
८. टेक्स्टाईल (गारमेंट) क्लस्टर विटा, जि. सांगली
९. गणेशमुर्ती क्लस्टर पेण, जि. अलिबाग-रायगड
१०. पेंट, व्हॅर्निश अॅन्ड एनॅमल क्लस्टर पालघर, जि. ठाणे
११. लेदर क्लस्टर धारावी, जि. मुंबई
१२. सिल्वर क्लस्टर हुपरी, जि. कोल्हापूर
१३. ऑटो ॲण्ड इंजिनीअरींग क्लस्टर अहमदनगर
१४. रेडीमेड गारमेंट क्लस्टर नागपूर
१५. हर्बल, आयुर्वेदिक आणि कलर कॉस्मेटीक क्लस्टर वसई, जि. ठाणे
१६. टॅाय क्लस्टर मुंबई
१७. ऑटो काम्पोनन्ट क्लस्टर औरंगाबाद
१८. प्रिंटींग क्लस्टर औरंगाबाद
१९. प्रिंन्टींग क्लस्टर, उदगीर लातूर
२०. बांबू आर्टीकल्स क्लस्टर चंद्रपूर
२१. जॅगरी प्रोसेसिंग क्लस्टर कोल्हापूर
२२. पैठणी साडी क्लस्टर येवला, जि. नाशिक
२३. प्रिंन्टींग क्लस्टर, हडपसर जळगापुणे
२४. राईस मिल क्लस्टर, आरमोरी गडचिरोली
२५. टेक्स्टाईल क्लस्टर शिरपूर, जि. धुळे
२६. राईस मिल क्ल्स्टर मुल, जि. चंद्रपूर
२७. बांबू आर्टीकल्स क्लस्टर गडचिरोली
२८. टेक्सटाईल क्लस्टर मालेगाव, जि. नाशिक
२९. डाल मिल क्लस्टर नागपूर
३०. जनरल इंजिनिअरिंग अँन्ड अलाईड क्लस्टर भोसरी, जि. पुणे
३१. टेरी टॉवेल क्लस्टर सोलापूर
३२. टर्मरिक क्लस्टर सांगली
३३. कोकम प्रोसेसिंग क्लस्टर कुडाळ, जि. सिंधुदुर्ग
३४. गोल्ड ऑर्नामेंट क्लस्टर जळगांव
३५. इंजिनिअरिंग क्लस्टर जळगांव
३६. टायनी जनरल इंजिनिअरिंग अँन्ड अलाईड इंडस्ट्रीज क्लस्टर औरंगाबाद
३७. टेक्स्टाईल क्लस्टर नवापूर, जि.नंदुरबार
३८. कॉटन फॅब्रीक क्लस्टर हातकणंगले, जि.कोल्हापूर
३९. इंजिनियरींग क्लस्टर याड्राव, जि. कोल्हापूर
४०. राईस मिल क्लस्टर, रामटेक नागपूर
४१. ऑटो अँन्ड इंजिनिअरिंग क्लस्टर नागपूर
४२. टेक्स्टाईल क्लस्टर, वेस्ट विदर्भ नागपूर

पात्रता निकष

विशिष्ट भौगोलिक क्षेत्रावर कार्यरत एकाच प्रकारच्या, औद्योगिक प्रवर्गातील किमान २० सूक्ष्म, लघु कार्यरत घटक.

सांख्यिकी

औद्योगिक समूह विकास प्रकल्पांना केंद्र शासनाकडून खालील कारणासाठी अनुदान प्राप्त झाले आहे, तत्तसंबंधिची माहिती खालीलप्रमाणे आहे (रक्कम ₹ लाख):

अ.क्र. वर्ष हेतू (कार्यक्रम) केंद्र शासनाचे वितरित अनुदान
१. २००८-२००९ १५ समूह प्रकल्पांना निदानोपयोगी अभ्यास अहवाल तयार करणेसाठी २०.२५
२. २००९-२०१० ११ समूह प्रकल्पांकरीता क्षमतेचा निदानोपयोगी अभ्यास अहवाल तयार करणेसाठी ५७.४५५
३. २००९-२०१० समूह प्रकल्पांचा निदानोपयोगी अभ्यास अहवाल तयार करणेसाठी ६.७५
४. २०१०-२०११
२ समूह प्रकल्पांचा निदानोपयोगी अभ्यास अहवाल १.६९
१ समूह प्रकल्पाचा क्षमतावृद्धी कार्यक्रम ७.२०
२ समूह प्रकल्पांच्या सामायिक सुविधा केंद्र उभारणीसाठी ७०८.००
५. २०११-२०१२
४ समूह प्रकलपांचा निदानोपयोगी अभ्यास अहवाल तसेच क्षमतावृद्धी कार्यक्रम २५.०१५
२ समूह प्रकल्पाचा सामायिक सुविधा केंद्र उभारणीकरीता ८७४.५०
६. २०१२-२०१३
१ समूह प्रकल्पाचा क्षमतावृद्धी कार्यक्रमासाठी ७.४०
७. २०१३-२०१४
१ समूह प्रकल्पाच्या सामायिक सुविधा केंद्र पूर्णत्वाकरीता १०५.९७४
१ समूह प्रकल्पाचा सामायिक सुविधा केंद्र उभारणीकरीता ५३५.९८
१ समूह प्रकल्पाचा निदानोपयोगी अभ्यास अहवालासाठी १.८५
१ समूह प्रकल्पाचा क्षमतावृद्धी कार्यक्रमासाठी ७.४२
४ समूह प्रकल्पाचा क्षमतावृद्धी कार्यक्रमासाठी ३२.८४
८. २०१४-२०१५ ६ समूह प्रकल्पाचा सामायिक सुविधा केंद्र उभारणीकरीता २५२२.३७
9. २०१५-२०१६
६ समूह प्रकल्पाचा सामायिक सुविधा केंद्र उभारणीकरीता २२५१.३२
१ प्रकल्प औद्योगिक पायाभूत विकास २००.००
३ प्रकल्प क्षमतावृध्दी कार्यक्रम १९.९१
१०. २०१६-२०१७ ८ समूह प्रकल्पाचा सामायिक सुविधा केंद्र उभारणीकरीता (ऑक्टोबर-२०१६ अखेर) २७५३.१३
एकूण १०५४३.७५

अंतिम मंजूरी प्राप्त झालेल्या समूह प्रकल्पांच्या वर्षनिहाय तपशिल व मंजूर प्रकल्प तपशील खालीलप्रमाणे आहे (रक्कम ₹ कोटीत):

अ.क्र. वर्ष निहाय प्रकल्पाचे नाव मंजूर प्रकल्प किंमत केंद्र शासनाचे मंजूर अनुदान
१. २०१०-२०११
गारमेंट क्लस्टर, विटा, सांगली ०९.१० ०६.८२
रेझीन क्लस्टर, सांगली ०७.०८ ०४.९६
फ्लाय ॲश क्लस्टर, चंद्रपूर १५.३७ १३.५०
२. २०११-२०१२
टेक्स्टाईल क्लस्टर, शिरपूर, धुळे १४.२३ ०९.९६
गारमेंट क्लस्टर, नागपूर १५.९१ १३.३९
३. २०१२-२०१३
इचलकरंजी टेक्स्टाईल क्लस्टर, कोल्हापूर १६.५७ १२.७०
टेक्स्टाईल क्लस्टर, मालेगांव, नाशिक १५.८४ ११.९६
दाल मिल क्लस्टर, नागपूर १६.२७ १०.०३
४. २०१३-२०१४
अहमदनगर ऑटो ॲन्ड इंजि. क्लस्टर, अहमदनगर १५.२३ १०.२१
जनरल इंजिनिअरिंग ॲन्ड अलाईड क्लस्टर, भोसरी, पुणे १५.२९ १३.४३
मँगो प्रोसेसिंग क्लस्टर, रत्नागिरी १५.०३ ११.३९
५. २०१४-२०१५
टर्मरिक क्लस्टर, सांगली १५.५० १३.४९
महासैनिक औद्योगिक इंडस्ट्रियल इस्टेट क्लस्टर, पुणे ८.१८ ६.५४
६. २०१५-२०१६
टेक्सटाईल्स क्लस्टर, नवापूर, नंदुरबार १५.९३ १०.५०
टेरिटॉवल क्लस्टर, सोलापूर १७.९१ १२.९१
कॉटन फॅब्रीक क्लस्टर, कोल्हापूर १६.७४ १२.००
एकूण २३०.१८ १७३.७९

राज्य शासनाचा सहभाग:- शासन निर्णय दिनांक ९ जून, २०१०, दिनांक २२ ऑक्टोबर, २०१० व २ जुन, २०१५ अन्वये सामायिक सुविधा केंद्राच्या उभारणीकरीता राज्य शासनाचा १०% सहभाग देण्यास योजना जाहीर करणेत आली आहे. खालील समूह प्रकल्पांना राज्याच्या सदर योजनेचा लाभ देण्यात आला आहे.

अ.क्र. हेतू (कार्यक्रम) सामायिक सुविधा केंद्राच्या उभारणीकरीता राज्य शासनाचा 10 टक्के सहभाग योजनेचे नाव राज्य शासनाचे वितरित अनुदान (रू.लाखात)
१. गारमेंट क्लस्टर, विटा, सांगली २०१०-२०११ ५३.८८
२. सांगली ग्रेप प्रोसेसिंग क्लस्टर, सांगली
२०१०-२०११ ४२.५३
२०११-२०१२ २८.३६
3. टेक्स्टाईल क्लस्टर, मालेगांव, नाशिक
२०१३-२०१४ ६०.००
२०१४-२०१५ ६०.००
२०१५-२०१६ ३०.००
4. दाल मिल क्लस्टर, नागपूर
२०१३-२०१४ ५७.५८४
२०१५-२०१६ ५७.५८
5. पॉवरलूम क्लस्टर, शिरपूर, धुळे
२०१३-२०१४ ५६.९२४
२०१४-२०१५ ४२.६९३
२०१६-२०१७ ४२.६९३
6. ऑटो अँन्ड इंजिनिअरिंग क्लस्टर, अहमदनगर
२०१५-२०१६ ६०.००
२०१५-२०१६ ६०.००
२०१६-२०१७ २९.७५३४४
एकूण ६८१.९९७४४
शासन निर्णय आणि सूचना
GoI Modified Guidelines MSE-CDP - १०.०२.२०१० तपशील पहा
Revised guidlines MSECDP - २७.०७.२०१६ तपशील पहा
उद्योग संचालनालय , महाराष्ट्र शासन यांच्या मालकीच्या सामग्री शेवटचा बदल: ११.०२.२०१६