वर जा

निर्यात सुविधा

  • परिचय
  • योजना
  • पात्रता निकष
  • सूचना
  • एफ.ए.क्यू

परिचय

महाराष्ट्र राज्यातून प्रामुख्याने हिरे आणि जडजवाहिरे, पेट्रोकेमिकल्स , अभियांत्रिकी वस्तू, धातू व धातूची उत्पादने, औषधे, तयार कपडे, कृषी - आधारित उत्पादने आणि प्लास्टिक व प्लॅस्टिकच्या वस्तूंची निर्यात केली जाते. निर्यातदारांच्या प्रयत्नांना मान्यता म्हणून आणि राज्याच्या निर्यातीस चालना देण्यासाठी महाराष्ट्र शासन राज्यातील उत्कृष्ट निर्यातदारांना त्यांच्या निर्यातीच्या कामगिरीनुसार पुरस्कारप्रदान करणेस पुढाकार घेत आहे. तसेच देशातील व परदेशातील आंतरराष्ट्रीय प्रदर्शनात भाग घेणा-या लघुउद्योजकांना प्रदर्शनातील जागेच्या भुईभाड्यामध्ये ५०% किंवा जास्तीत जास्त ₹ १.०० लाख(रुपये एक लाख) इतके अनुदान देण्याची योजनाही शासनाकडून राबविली जात आहे.

महाराष्ट्र राज्यातून आणि देशातून होणारी निर्यात (₹ कोटीत) खालील तक्त्यात दिली आहे:

क्रमांक वर्ष महाराष्ट्र भारत
१. २००८-२००९ २,२६,७९४ ८,३९,९७७
२. २००९-२०१० २,२८,१८४ ८,४५,१२५
३. २०१०-२०११ ३,०८,५१५ ११,४२,६४९
४. २०११-२०१२ ३,९४,००५ १४,५९,२८०
५. २०१२-२०१३ ४,१७,६२६ १५,४६,७६६
६. २०१३-२०१४ ४,३२,५७६ १६,०२,१३४
७. २०१४-२०१५ ५,०३,७०९ १८,६५,५८९
८. २०१५-२०१६
(माहे एप्रिल २०१५ ते जूलै २०१५ पर्यंत)
१,५१,४३७ ५,६०,८७८

योजना

राज्यस्तरीय योजना : निर्यात प्रचालनात वाढ करणे
  1. देशातील/परदेशातील आंतरराष्ट्रीय प्रदर्शनातून भाग घेणा-या लघु उद्योजकांना प्रदर्शनातील जागेच्या भाड्यामध्ये ५०% अनुदान देणे
  2. निर्यात प्रचालन कार्यवृद्धीअंतर्गत इंडिया ट्रेड प्रमोशन ऑर्गनायझेशन, नवी दिल्ली तसेच केंद्र शासन मान्य इतर अंगीकृत निर्यात प्रचालन संस्था/परिषदांनी प्रमाणित केलेल्या देशातील व परदेशातील आंतरराष्ट्रीय प्रदर्शनात भाग घेणा-या लघु उद्योजकांना प्रदर्शेंनातील जागेच्या भुईभाड्यामध्ये राज्य शासनाकडून ५० % किंवा जास्तीत जास्त ₹ १.०० लाख (रुपये एक लाख) इतके अनुदान देण्यात येते. देशातील व परदेशातील आंतरराष्ट्रीय प्रदर्शनात भाग घेण्यासाठी लघु उद्योजकांवरील आर्थिक भार अंशत: कमी करुन त्यांना अशा प्रकारच्या प्रदर्शनात भाग घेण्यास प्रवृत्त करणे हा या योजनेचा प्रमुख हेतू आहे. त्यामुळे लघु उद्योग क्षेत्रातील औद्योगिक घटकांच्या उत्पादित वस्तूंना जागतिक बाजारपेठ मिळण्यास व पर्यायानी राज्यातून निर्यातीत वाढ होण्यास मदत होते.

    डाऊनलोड जागेच्या भाड्यामध्ये ५०% अनुदान देण्यासाठी प्रतिज्ञापत्र स्वरूप डाऊनलोड जागेच्या भाड्यामध्ये ५०% अनुदान देणे अर्ज नमुना

  3. उत्कृष्ट निर्यातदारांना त्यांच्या निर्यातीच्या उत्कृष्ट कामगिरीबद्दल पुरस्कार आणि गुणवत्ता प्रमाणपत्र देण्याबाबतची योजना
  4. राज्यातील निर्यातदारांना मान्यता प्राप्त व्हावी आणि त्यांनी केलेल्या उत्कृष्ट निर्यातीबद्दल त्यांचे कौतुक व्हावे व त्यामुळे त्यांनी भविष्यकाळात वरील निर्यातदारांनी गतकालापेक्षा अधिक चांगली कामगिरी करुन जास्तीत जास्त निर्यात करावी व निर्यात प्रचालनास हातभार लावावा या हेतूने सन १९७१-७२ या वर्षापासून राज्यातील उत्कृष्ट निर्यातदारांना पुरस्कार (सन्मान चिन्हे व गुणवत्ता प्रमाणपत्रे) प्रदान करणे बाबतची योजना राबविली जात आहे.

    या योजनेतंर्गत राज्यातील विविध प्रवर्गातील उद्योग घटकाकडून दरवर्षी अर्ज मागविण्यांत येतात. या योजनेतंर्गत नियुक्त केलेल्या निवड समितीमार्फत विविध प्रवर्गातील "उत्कृष्ट निर्यातदाराची" निवड करण्यांत येते. निवड झालेल्या निर्यातदारांना निर्यात पुरस्कार (सन्मान चिन्हे आणि गुणवत्ता प्रमाणपत्रे) समारंभपूर्वक प्रदान करण्यांत येतात.

    डाऊनलोड उत्कृष्ठ निर्यादार पुरस्कार अर्ज नमूना

निर्यात प्रचालन शाखेतील इतर कामाबाबतची माहिती
  1. औद्योगिक प्रदर्शनांत भाग घेणे
  2. लघु उद्योग घटकांनी तयार केलेल्या मालाला दृष्य प्रसिध्दी मिळावी या हेतूने नियमितपणे भारतीय व्यापार मेळा प्राधिकरण, नवी दिल्ली यांनी आयोजित केलेल्या आंतरराष्ट्रीय प्रदर्शनात दरवर्षी भाग घेण्यांत येतो. सन १९८३ पर्यंत उद्योग संचालनालयामार्फत या प्रदर्शनात भाग घेतला जात असे. तथापि सन १९८४ पासून महाराष्ट्र लघु उद्योग विकास महामंडळ शासनाच्या वतीने या प्रदर्शनात भाग घेते. त्यासाठी लागणा-या खर्चाची रक्कम उद्योग संचालनालयामार्फत महामंडळास दिली जाते. या प्रदर्शनात भाग घेणा-या लघु उद्योग घटकांकडून सामान्यत: स्टॉलचे भुईभाडे अथवा तदनुषांगिक होणारा कोणताही खर्च वसूल केला जात नाही. अशा प्रकारच्या आंतरराष्ट्रीय प्रदर्शनात भाग घेतल्यामुळे राज्यातील लघु उद्योग क्षेत्रातील घटकांच्या उत्पादित वस्तूंना मोठया प्रमाणावर प्रसिध्दी मिळून, त्यांना आंतरराष्ट्रीय बाजारपेठ उपलब्ध होण्यास मोलाची मदत होते. या प्रदर्शनात जगातील अनेक राष्ट्रे भाग घेत असतात त्यामुळे त्यांचेशी आंतरराष्ट्रीय निर्यात व्यापार विषयी बोलणी व करारमदार करणे राज्यातील लघु उद्योग घटकांना शक्य होते. त्यामुळे आपल्या राज्याची निर्यात व्यापारात वाढ होण्यास फार मोठा हातभार लागतेा.

  3. कायमस्वरुपाचे प्रदर्शन केंद्र स्थापन करणे
  4. पुणे-नाशिक मार्गावरील मोशी येथे,औरंगाबाद जवळील शेंद्रे औद्योगिक वसाहतीत व नागपूरमधील अंबाझरी गार्डन येथे विविध शासकीय व स्थानिक संस्थाच्या सहभागाने आंतरराष्ट्रीय प्रदर्शन केंद्रे विकसित करण्यात येत आहेत.

पात्रता निकष

उत्कृष्ठ निर्यातदार पुरस्कारासाठी करावयाच्या अर्जासाठी असलेले निकष:
  1. घटक/उपक्रमाची मागील २ वर्षांची निर्यात ₹ २.०० कोटी असणे आवश्यक आहे.
  2. घटक/उपक्रमाने संबंधित प्राधिकाराकडे आवेदन पत्र दाखल केले असले पाहिजे.
  3. खालील प्रवर्गातील निर्यातदार पुरस्कारासाठी अर्ज करु शकतात:
  1. खालील प्रवर्गातील नोंदणीकृत निर्यातदार समाविष्ट आहेत:
    • मोठे उत्पादक घटक
    • लघु/मध्यम उत्पादक घटक
    • व्यापारी निर्यातदार
    • मान्यताप्राप्त निर्यात घर
    • व्यापार घर (ट्रेडिंग हाऊस)
    • राज्य सरकारी महामंडळ
    • सेवा निर्यातदार घटक
  2. खालीलउत्पादन करणारे निर्यातदार समाविष्ट आहेत
    1. सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग:
      • अभियांत्रिकी उत्पादने (canalized आयटम वगळून)
      • इलेक्ट्रॉनिक्स आणि इलेक्ट्रिकल उत्पादने(SEEPZ भागातीलघटकांसाठी)
      • इलेक्ट्रॉनिक्स आणि इलेक्ट्रिकल उत्पादने (SEEPZ क्षेत्रापेक्षा इतर घटकांसाठी)
      • मूलभूत रसायने, औषधे आणि सौंदर्यप्रसाधने उत्पादने
      • रासायनिक आणि संबंधित उत्पादने (काच आणि मातीची भांडी, रंग आणि varnishes, कागद, कागद उत्पादने, लाकूड आणि लाकूड उत्पादने, रबर आणि रबर वस्तू, इत्यादी)
      • प्लास्टिक आणि जमिनीवर अंथरायचे कॅन्वसचे जाड कापड उत्पादने (प्रक्रिया लपविला आणि skins समावेश)
      • लेदर आणि चामड्याच्या वस्तू
      • ताज्या भाज्या, फळे, प्रक्रिया अन्न व इतर कृषी उत्पादने
      • सागरी उत्पादने (मांस समावेश)
      • तयार कपडे वगळता कापड सर्व प्रकार
      • तयार कपडे
      • हस्तकला
      • हिरे आणि दागिने(व्हर्जिन चांदी वगळून)
      • क्रीडा सामान
    2. मोठे उद्योग
      • अभियांत्रिकी उत्पादने (canalized आयटम वगळून)
      • इलेक्ट्रॉनिक्स आणि इलेक्ट्रिकल उत्पादने(SEEPZ भागातील घटकांसाठी)
      • इलेक्ट्रॉनिक्स आणि इलेक्ट्रिकल उत्पादने (SEEPZ क्षेत्रापेक्षा इतर घटकांसाठी)
      • मूलभूत रसायने, औषधे आणि सौंदर्यप्रसाधने उत्पादने
      • रासायनिक आणि संबंधित उत्पादने (काच आणि मातीची भांडी, रंग आणि varnishes, कागद, कागद उत्पादने, लाकूड आणि लाकूड उत्पादने, रबर आणि रबर वस्तू, इत्यादी)
      • प्लास्टिक आणि जमिनीवर अंथरायचे कॅन्वसचे जाड कापड उत्पादने (प्रक्रिया लपविला आणि skins समावेश)
      • लेदर आणि चामड्याच्या वस्तू
      • ताज्या भाज्या, फळे, प्रक्रिया अन्न व इतर कृषी उत्पादने
      • सागरी उत्पादने (मांस समावेश)
      • तयार कपडे वगळता कापड सर्व प्रकार
      • तयार कपडे
आंतरराष्ट्रीय व्यापार जत्रा/प्रदर्शने यामध्ये भाग घेणाऱ्या लघु उद्योजकांना ५०% भुईभाडे अनुदान देण्याचे निकष:
  1. आंतरराष्ट्रीय व्यापार जत्रा/प्रदर्शने यामध्ये सहभागी झालेल्या लघु उद्योजकांने भारतीय व्यापार प्रचालन संघटना (ITPO), नवी दिल्ली संबंधित निर्यात प्रचालन परिषदेचे प्रमाण पत्र सादर करावे.
  2. आंतरराष्ट्रीय व्यापार जत्रा/प्रदर्शने या मध्ये सहभागी झालेल्या लघु उद्योजकांने संबंधित निर्यात प्रचालन परिषदेचे प्रमाणपत्र सादर केल्यानंतर प्रत्यक्ष जागेच्या भुईभाडयाच्या ५०% किंवा ₹ १.०० लक्ष यापैकी जे कमी असेल तेवढे अनुदान म्हणून एका आर्थिक वर्षात मंजूर केले जाईल.
  3. या योजनेचा लाभ लघु उद्योगास ५ (पाच) वेळा आंतरराष्ट्रीय व्यापार यात्रा / प्रदर्शनात सहभाग किंवा ५ (पाच) वर्षे आंतरराष्ट्रीय व्यापार यात्रा / प्रदर्शनात सहभाग घेण्यापर्यंत मर्यादित आहे.
  4. ज्या लघु उद्योगांनी ५ (पाच) वेळा आंतरराष्ट्रीय व्यापार यात्रा / प्रदर्शनात सहभाग घेतला आहे किंवा ५ (पाच) वर्षे वेळा आंतरराष्ट्रीय व्यापार यात्रा / प्रदर्शनात सहभाग घेतला आहे ते अनुदानास पात्र ठरणार नाहीत.
  5. कृषी उद्योग, ग्रामीण उद्योग, मत्स्यव्यवसाय / सागरी उत्पादने उद्योग करणाऱ्या लघु उद्योगांना प्राधान्य देण्यात येईल.
शासन निर्णय आणि सूचना
GR उत्कृष्ठ निर्यातदार पुरस्कार - २०.०१.२००३ तपशील पहा
GR ५० टक्के भूईभाडे अनुदान - २४.०१.२००१ तपशील पहा

एफ.ए.क्यू - निर्यात सुविधा


महाराष्ट्रातील निर्यातदारांसाठी असलेल्या उत्कृष्ठ निर्यातदार पुरस्कार योजनेचा मुख्य उद्देश काय आहे?

महाराष्ट्रात उत्कृष्ठ निर्यातदार पुरस्कार योजना १९७१-७२ पासून राबविण्यात येत आहे. या योजनेचा मुख्य उद्देश राज्यातील नोंदणीकृत निर्यातदारांना मान्यता प्राप्त व्हावी आणि भविष्यात त्यांनी निर्यातीची उच्च कामगिरी करण्यासाठी त्यांना प्रोत्साहित करण्याचा आहे.

उत्कृष्ठ निर्यात पुरस्कारासाठी कोण अर्ज करू शकतो?

महाराष्ट्र राज्यात उत्पादन करीत असलेला आणि मागील वर्षात ₹ २.०० कोटींपेक्षा अधिक निर्यात केलेला निर्यातदार उत्कृष्ठ निर्यात पुरस्कारासाठी अर्ज करू शकतो.

उत्कृष्ठनिर्यात पुरस्कारासाठीकोणते प्रवर्ग आहेत?

उत्कृष्ठ निर्यात पुरस्कारासाठीखालील प्रवर्ग आहेत:

  1. मोठे उत्पादक घटक
  2. लघु/मध्यम उत्पादक घटक
  3. व्यापारी निर्यातदार
  4. मान्यताप्राप्त निर्यात घर
  5. व्यापार घर (ट्रेडिंग हाऊस)
  6. राज्य सरकारी महामंडळ
  7. सेवा निर्यातदार घटक

खालील उत्पादन करणारे निर्यातदार समाविष्ट आहेत:

  • सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग:
    • अभियांत्रिकी उत्पादने (canalized आयटम वगळून)
    • इलेक्ट्रॉनिक्स आणि इलेक्ट्रिकल उत्पादने(SEEPZ भागातीलघटकांसाठी)
    • इलेक्ट्रॉनिक्स आणि इलेक्ट्रिकल उत्पादने (SEEPZ क्षेत्रापेक्षा इतर घटकांसाठी)
    • मूलभूत रसायने, औषधे आणि सौंदर्यप्रसाधने उत्पादने
    • रासायनिक आणि संबंधित उत्पादने (काच आणि मातीची भांडी, रंग आणि varnishes, कागद, कागद उत्पादने, लाकूड आणि लाकूड उत्पादने, रबर आणि रबर वस्तू, इत्यादी)
    • प्लास्टिक आणि जमिनीवर अंथरायचे कॅन्वसचे जाड कापड उत्पादने (प्रक्रिया लपविला आणि skins समावेश)
    • लेदर आणि चामड्याच्या वस्तू
    • ताज्या भाज्या, फळे, प्रक्रिया अन्न व इतर कृषी उत्पादने
    • सागरी उत्पादने (मांस समावेश)
    • तयार कपडे वगळता कापड सर्व प्रकार
    • तयार कपडे
    • हस्तकला
    • हिरे आणि दागिने(व्हर्जिन चांदी वगळून)
    • क्रीडा सामान
  • मोठे उद्योग
  • वरील १ ते ११ उत्पादनांसाठी निर्यात पुरस्कार/गुणवत्ता प्रमाणपत्रा करीता विचारात घेतले जातात.

लघु उद्योजकांना आंतरराष्ट्रीय प्रदर्शन/व्यापार जत्रा यांमध्ये सहभागी होण्यासाठी प्रोत्साहित करण्यासाठी कोणती योजना आहे का?

इंडिया ट्रेड प्रमोशन ऑर्गनायझेशन, नवी दिल्ली तसेच केंद्र शासन मान्य इतर अंगीकृत निर्यात प्रचालन संस्था /परिषदांनी प्रमाणित केलेल्या देशातील व परदेशातील आंतरराष्ट्रीय प्रदर्शनात भाग घेणा-या लघु उद्योजकांना प्रदर्शनातील जागेच्या भुईभाड्यामध्ये राज्य शासनाकडून ५०% किंवा जास्तीत जास्त ₹ १.०० लाख (रुपये एक लाख) इतके अनुदान देण्यात येते. देशातील व परदेशातील आंतरराष्ट्रीय प्रदर्शनात भाग घेण्यासाठी लघु उद्योजकांवरील आर्थिक भार अंशत: कमी करुन त्यांना अशा प्रकारच्या प्रदर्शनात भाग घेण्यास प्रवृत्त करणे हा या योजनेचा प्रमुख हेतू आहे. त्यामुळे लघु उद्योग क्षेत्रातील औद्योगिक घटकांच्या उत्पादित वस्तूंना जागतिक बाजारपेठ मिळण्यास व पर्यायानी राज्यातून निर्यातीत वाढ होण्यास मदत होते.

उद्योग संचालनालय , महाराष्ट्र शासन यांच्या मालकीच्या सामग्री शेवटचा बदल: ११.०२.२०१६