सेवा
नोंदणीकृत वापर कर्त्यासाठी खालील सेवा उपलब्ध आहेत:
- मुंबई कुळवहिवाट व शेत जमिन अधिनियम १९४८ (सुधारणा १९९४ व २००५) अंतर्गत खऱ्याखुऱ्या औद्योगिक वापरासाठी १० हेक्टर पेक्षा जास्त शेत जमीन खरेदीस परवानगी देणे ऑनलाईन अर्ज
- मध्यवर्ती भांडार खरेदी संघटने करीता नोंदणी देणे
- स्थानिक लोकांना रोजगार विवरणपत्र क्र. १ व २ दाखल करुन घेणे
- सूक्ष्म व लघु उपक्रमांना आजारी उद्योग प्रमाणपत्र देणे
- वंगण तेल आणि ग्रीस च्या उत्पादन / विक्रि साठी परवाना देणे अथवा नुतनीकरण करुन देणे
- सार्वजनिक / खाजगी आयटी / आयटीईएस उद्याने तसेच सार्वजनिक / खाजगी आयटी / आयटीईएस घटकांना इरादापत्र अथवा नोंदणी देणे
- सार्वजनिक / खाजगी बीटी उद्याने तसे त्यामधिल घटकांना इरादापत्र अथवा नोंदणी देणे
- इरादापत्र अथवा नोंदणी दिलेल्या आयटी/ आयटीईएस घटकांचा वार्षिक विवरण दाखल करुन घेणे
- औद्योगिक वापरासाठी १० हेक्टर पेक्षा जास्त शेत जमीन खरेदीस परवानगी दिलेल्या घटकांचा वार्षिक विवरण दाखल करुन घेणे
योजना
नोंदणीकृत वापर कर्त्यासाठी खालील योजना उपलब्ध आहेत:
केंद्र शासन
- पंतप्रधान रोजगार निर्मिती कार्यक्रम
राज्य शासन
- सामूहिक प्रोत्साहन योजना २०१३
- सामूहिक प्रोत्साहन योजना २०१३ अंतर्गत मुद्रांक शुल्क सूट प्रमाणपत्र देणे ऑनलाईन अर्ज
- सामूहिक प्रोत्साहन योजना २०१३ अंतर्गत पात्रताप्रमाणपत्र देणे ऑनलाईन अर्ज
- सामूहिक प्रोत्साहन योजना २०१३ अंतर्गत देय प्रोत्साहनांना मंजूरी देणे ऑनलाईन अर्ज
- सामूहिक प्रोत्साहन योजना २०१३ अंतर्गत वार्षिक विवरण आणि खाते विधान दाखल करुन घेणे
- जिल्हा उद्योग केंद्र कर्ज योजना
- बेरोजगारांसाठी बीज भांडवल योजना
- उद्योजकता विकास प्रशिक्षण कार्यक्रम
ऑनलाइन अर्ज प्रक्रिया
निम्नलिखित अनुप्रयोग प्रक्रिया पद्धती आहेत:
- अर्जाच्या छाननी दरम्यान विभागाने अर्जासंदर्भात एखादा प्रश्न उपस्थित केल्यास वापरकर्त्याला एक ई मेल आणि एसएमएस प्राप्त होईल. प्रतीक्षा कालावधी पूर्ण होईपर्यंत या प्रश्नांच्या पूर्ततेकरीता वापरकर्त्याला विभागाकडून ठराविक कालांतराने स्मरणपत्रे पाठविली जातील
- संकेतस्थळावर लॅाग इन करून, “माय ॲप्लिकेशन” या पानामधिल “मला नियुक्त केलेले प्रश्न” (Queries Assigned to Me)या विभागामध्ये, वापरकर्ता विभागाने उपस्थित केलेल्या प्रश्नांवरील त्याची उत्तरे दाखल करु शकेल
- विभागाने उपस्थित केलेल्या प्रश्नांवरील त्याची उत्तरे यशस्वीरीत्या सादर झाल्यावर वापरकर्त्याला एक ई मेल आणि एसएमएसव्दारे सूचना प्राप्त होईल.
- अर्जाला अंतिम मान्यता मिळाल्यावर वापरकर्त्याला एक ई मेल आणि एसएमएसव्दारे सूचना प्राप्त होईल.
- “माय ॲप्लिकेशन” या पानामधिल “मान्यता” (Approved) या विभागामधून वापरकर्ता त्याने अर्ज केलेल्या सेवेच्या मान्यताप्राप्त अर्जाचे प्रमाणपत्र / मान्यतापत्र पाहू शकेल अथवा डाउनलोड करु शकेल