औद्योगिक दृष्टया अविकसित व विकसनशील भागात मोठया प्रमाणात औद्योगिक गुंतवणूक व्हावी व औद्योगिक विकासास चालना मिळावी या उद्देशाने राज्य शासन सन १९६४ पासून सामुहिक प्रोत्साहन योजना राबवित आहे. योजनेमध्ये राज्य शासनाच्या औद्योगिक धोरणानुसार वेळोवेळी सुधारणा करण्यात येत असतात. शासन निर्णय दिनांक १ एप्रिल २०१३ नुसार शासनाने सामुहिक प्रोत्साहन योजना - २०१३ अंमलात आणली आहे. प्रचलित योजनेचा कालावधी १ एप्रिल २०१३ ते ३१.०३.२०१८ पर्यंत आहे.
राज्यातील वैयक्तीक, भागीदारी, खाजगी क्षेत्र, केंद्र/राज्य शासनाच्या सार्वजनिक क्षेत्र / संयुक्त क्षेत्र, सहकारी संस्था तसेच केंद्रपुरस्कृत सार्वजनिक क्षेत्र (फक्त विशाल उद्योग) यामधिल सूक्ष्म, लघु व मध्यम उपक्रम व मोठया / विशाल / अतिविशाल उद्योग घटक सामुहीक प्रोत्साहन योजना २०१३ अंतर्गत समाविष्ट आहेत.
राज्यातील सर्व जिल्हयातील तालुक्यांची औद्योगीक विकासाच्या प्रतवारीनुसार अ, ब, क, ड , ड+, विना उद्योग जिल्हा व नक्षलग्रस्त क्षेत्र अशा सात गटात विभागणी करण्यांत आलेली आहे.
राज्यामध्ये विशाल प्रकल्प धोरण सन २००५ पासून राबविण्यात येत आहे. राज्यातील विशाल प्रकल्पांना विविक्षित एकत्रित सुविधा/ प्रोत्साहने मंजूर मर्यादेपर्यंत ठरविण्याचे अधिकार मा. प्रधान सचिव, उद्योग, महाराष्ट्र राज्य यांना आहेत. तसेच मा. मुख्यमंत्री, महाराष्ट्र राज्य यांचे अध्यक्षतेखालील आधारभूत सुविधा समितीस प्रतिष्ठित विशाल प्रकल्पांची व अतिविशाल प्रकल्पांची प्रत्येक प्रकरणी परिक्षण करुन त्यास विशेष / अतिरिक्त प्रोत्साहने देण्याचे अधिकार आहेत.
शासन निर्णयानुसार खाली दर्शविलेल्या किमान मर्यादांनुसार स्थिर भांडवली गुंतवणूक असलेल्या किंवा प्रत्यक्ष नियमित रोजगार निर्माण करणाऱ्या उत्पादक घटकांना अतिविशाल किंवा विशाल प्रकल्प म्हणून मान्यता देण्यात येते:
प्रकल्प प्रकार | तालुका / विभाग वर्गवारी | किमान स्थीर भांडवल अनुदान (₹ कोटी) | किमान थेट रोजगार निर्मिती |
विशाल प्रकल्प | अ व ब | ७५० | १,५०० |
क | ५०० | १,००० | |
ड व ड+ | २५० | ५०० | |
विना उद्योग जिल्हा व नक्षलग्रस्त क्षेत्र | १०० | २५० | |
अति विशाल प्रकल्प | राज्यांतर्गत | १,५०० | ३,००० |
सामूहीक प्रोत्साहन योजने अंतर्गत खालील सेवा ऑनलाईन उपलब्ध आहेत:
सदर योजनेअंतर्गत सूक्ष्म, लघु, मध्यम व मोठया उद्योग घटकांना खालील प्रोत्साहने देय आहेत:
नविन सूक्ष्म, लघु, मध्यम व मोठया उद्योग घटकांना त्यांच्या पात्र गुंतुवणुकीच्या प्रमाणात एकत्रित प्रोत्साहने देय आहेत. तालुका वर्गवारीनुसार सदर प्रोत्साहनांच्या टक्केवारीची मर्यादा खालीलप्रमाणे आहे-
तालुका वर्गवारी | स्थिर भांडवली गुंतवणूकीची टक्केवारी | कालावधी (वर्षामध्ये) | ||
सुक्ष्म व लघु उद्योग | मध्यम व मोठे उद्योग | सुक्ष्म व लघु उद्योग | मध्यम व मोठे उद्योग | |
अ | - | - | ७ | ७ |
ब | २० | - | ७ | ७ |
क | ४० | ३० | ७ | ७ |
ड | ७० | ४० | १० | ७ |
ड+ | ८० | ५० | १० | ७ |
विना उद्योग जिल्हा | ९० | ७० | १० | ७ |
नक्षलग्रस्त क्षेत्र | १०० | ८० | १० | ७ |
अन्न व कृषी प्रक्रिया उत्पादक उद्योग घटकांना १० टक्के अतिरिक्त प्रोत्साहने देय करण्यात आलेली असून प्रोत्साहने पात्रता कालावधीमध्ये १ वर्षाने वाढ केलेली आहे.
राज्यातील विविध भागामध्ये स्थापित झालेले नवीन/ विस्तारीत सुक्ष्म, लघु व मध्यम उद्योग घटक खालीलप्रमाणे औद्योगिक प्रोत्साहन अनुदान मिळण्यास पात्र आहेत:
अ. क्र. | तालुका /क्षेत्र वर्गवारी | प्रति वर्ष औद्योगिक प्रोत्साहन अनुदान मिळण्याचे परिमाण |
१. | नक्षलग्रस्त क्षेत्र | राज्यातील विक्रीवरील मूल्यवर्धित कर वजा इन्पुट टॅक्स क्रेडिट अधिक केंद्रिय विक्रीकर अधिक १०० टक्के आयटीसी |
२. | विना उद्योग जिल्हा | राज्यातील विक्रीवरील मूल्यवर्धित कर वजा इन्पुट टॅक्स क्रेडिट अधिक केंद्रिय विक्रीकर अधिक ७५ टक्के आयटीसी |
३. | संपूर्ण विदर्भ आणि मराठवाडा (अ.क्र. १ व २ सोडून) | राज्यातील विक्रीवरील मूल्यवर्धित कर वजा इन्पुट टॅक्स क्रेडिट अधिक केंद्रिय विक्रीकर अधिक ६५ टक्के आयटीसी |
४. | गट ड+ तालुका (अ.क्र. १ व ३ सोडून) | राज्यातील विक्रीवरील मूल्यवर्धित कर वजा इन्पुट टॅक्स क्रेडिट अधिक केंद्रिय विक्रीकर अधिक ५० टक्के आयटीसी |
५. | गट ड तालुका (अ.क्र. १ व ३ सोडून) | राज्यातील विक्रीवरील मूल्यवर्धित कर वजा इन्पुट टॅक्स क्रेडिट अधिक केंद्रिय विक्रीकर अधिक ४० टक्के आयटीसी |
६. | गट क तालुका | राज्यातील विक्रीवरील मूल्यवर्धित कर वजा इन्पुट टॅक्स क्रेडिट अधिक केंद्रिय विक्रीकर अधिक ३० टक्के आयटीसी |
७. | गट ब तालुका | राज्यातील विक्रीवरील मूल्यवर्धित कर वजा इन्पुट टॅक्स क्रेडिट अधिक केंद्रिय विक्रीकर अधिक २० टक्के आयटीसी |
राज्यातील निरनिराळया भागामध्ये स्थापित झालेले नवीन /विस्तारीत मोठे उद्योग घटक खालीलप्रमाणे औद्योगिक प्रोत्साहन अनुदान मिळण्यास पात्र आहेत:
अ. क्र. | तालुका /क्षेत्र वर्गवारी | प्रति वर्ष औद्योगिक प्रोत्साहन अनुदान मिळण्याचे परिमाण |
१. | नक्षलग्रस्त क्षेत्र | राज्यातील विक्रीवरील १०० टक्के मूल्यवर्धित कर वजा इन्पुट टॅक्स क्रेडिट अधिक केंद्रिय विक्रीकर |
२. | विदर्भ आणि मराठवाडामधील विना उद्योग जिल्हे | राज्यातील विक्रीवरील ९० टक्के मूल्यवर्धित कर वजा इन्पुट टॅक्स क्रेडिट अधिक केंद्रिय विक्रीकर |
३. | गट ड+ तालुका (अ.क्र. १ व २ सोडून) | राज्यातील विक्रीवरील ८० टक्के मूल्यवर्धित कर वजा इन्पुट टॅक्स क्रेडिट अधिक केंद्रिय विक्रीकर |
४. | गट ड तालुका (अ.क्र. १ व ३ सोडून) | राज्यातील विक्रीवरील ७० टक्के मूल्यवर्धित कर वजा इन्पुट टॅक्स क्रेडिट अधिक केंद्रिय विक्रीकर |
५. | गट क तालुका | राज्यातील विक्रीवरील ६० टक्के मूल्यवर्धित कर वजा इन्पुट टॅक्स क्रेडिट अधिक केंद्रिय विक्रीकर |
विस्तारीकरण व वैविध्य याकरिता पात्र असणाऱ्या अस्तित्वातील/नवीन सुक्ष्म, लघु, मध्यम व मोठे उद्योग घटक (माहिती तंत्रज्ञान / जैव तंत्रज्ञान उद्योग घटकासह) यांच्या विस्तारीकरणासाठी /वैविध्यतेसाठी प्रोत्साहनांचे प्रमाण पात्र स्थिर गुंतवणुकीच्या ७५ टक्के व पात्रता कालावधी देयपात्रता कालावधीपेक्षा १ वर्षाने कमी राहिल.
गट अ वगळता इतर सर्व गटातील पात्र नवीन सूक्ष्म, लघु व मध्यम उद्योग घटकांनी बँक व सार्वजनिक वित्तीय संस्था यांचेकडून स्थिर भांडवली गुंतवणूकीसाठी घेतलेल्या कर्जावर ५ टक्के व्याज अनुदान देय आहे. प्रोत्साहनाची रक्कम पात्र घटकाने त्या वर्षासाठी वापरलेल्या व भरलेल्या वीज देयकाच्या रक्कमेच्या मर्यादेत अनुज्ञेय आहे.
क, ड, ड+ आणि विना उद्योग क्षेत्रात तसेच नक्षलग्रस्त क्षेत्रामध्ये नव्याने स्थापन होणा-या उद्योग घटकांना पात्रता कालावधी करीता विद्युत शुल्क माफी देय आहे. राज्यातील उर्वरित क्षेत्रांतील (म्हणजे अ व ब) १०० टक्के निर्यातक्षम उद्योग, माहिती तंत्रज्ञान व जैव तंत्रज्ञान उत्पादक घटक यांना विद्युत शुल्क माफी पात्रता कालावधीसाठी देय आहे.
क, ड, ड+ व विना उद्योग जिल्हयातील तसेच नक्षलग्रस्त क्षेत्रातील नवीन उद्योग अथवा उद्योगांचा विस्तारीकरण/ वैविध्य करण्यासाठी कराव्या लागणाऱ्या दस्तऐवजावर अनुज्ञेय मुद्रांक शुल्कात दि. ०१.०४.२०१३ ते ३१.०३.२०१८ या कालावधीकरीता सूट देण्यात आली आहे. अ व ब क्षेत्रामध्ये सार्वजनिक उद्यानातील माहिती व जैव तंत्रज्ञान उत्पादक घटकांना १०० टक्के तर खाजगी उद्यानातील माहिती व जैव तंत्रज्ञान उत्पादक उद्योग घटकांना ७५ टक्के तसेच विशाल उद्योग घटकांना ५० टक्के मुद्रांक शुल्क माफी देय आहे.
गट अ क्षेत्रातील उद्योग घटक वगळून नवीन सूक्ष्म, लघु व मध्यम उद्योग घटक विद्युत दर अनुदान मिळण्यास पात्र आहेत. वापर केलेल्या व त्याची किंमत अदा केलेल्या वीज वापराकरिता विदर्भ, मराठवाडा , उत्तर महाराष्ट्र आणि कोकण विभागातील रायगड, रत्नागिरी व सिंधुदूर्ग जिल्हयातील उद्योग घटकाकरिता ₹ १/- प्रती युनिट व राज्यातील इतर क्षेत्रामधील उद्योग घटकाकरीता ₹ ०.५० प्रती युनिट यानुसार त्यांनी उत्पादनास सुरुवात केल्यापासून ३ वर्षाच्या कालावधीकरीता विद्युत दर अनुदान देय आहे.
गुणात्मक स्पर्धात्मकता, संशोधन व विकास कार्य आणि तांत्रिक श्रेणीमध्ये वाढ, पाणी व उर्जा सरंक्षण, पत मुल्यांकन याकरीता खालील अतिरीक्त प्रोत्साहने देय आहेत.
स्मॉल इंडस्ट्रीज डेव्हलेपमेंट बँक ऑफ इंडिया/शासनमान्य पत मूल्यांकन संस्था यांचेकडून केल्या जाणाऱ्या पत मूल्यांकनाकरिता येणा-या खर्चावर ७५टक्के अनुदान ₹ ४०,००० मर्यादेपर्यंत
सामूहीक प्रोत्साहन योजने अंतर्गत खालील सेवा ऑनलाईन उपलब्ध आहेत:
सामूहिक प्रोत्साहन योजनेकरिता महाराष्ट्र राज्याची विभागणी खालीलप्रमाणे करण्यात आली आहे:
गट अ | औद्योगिकदृष्टया विकसित क्षेत्र |
गट ब | थोडया प्रमाणात औद्योगिकदृष्टया विकसित क्षेत्र परंतु गट अ पेक्षा कमी विकसित क्षेत्र |
गट क | थोडया प्रमाणात औद्योगिकदृष्टया विकसित क्षेत्र परंतु गट अ व ब पेक्षा कमी विकसित क्षेत्र |
गट ड | थोडया प्रमाणात औद्योगिकदृष्टया विकसित क्षेत्र परंतु गट अ, ब व क पेक्षा कमी विकसित क्षेत्र |
गट ड+ | कमी प्रमाणात औद्योगिकदृष्टया विकसित क्षेत्र परंतु गट अ, ब, क व ड पेक्षा कमी विकसित क्षेत्र तसेच आधारभूत मूलभत सुविधांचा अभाव |
विना उद्योग जिल्हा | जेथे कोणताही मोठा उद्योग स्थापित झाला नाही आणि गट अ,ब,क,ड व ड+ क्षेत्र व्याप्त नसलेला |
नक्षलग्रस्त क्षेत्र | शासन निर्णय क्र.NAVIKA-२००८/C.R२०९/ka.१४१६ dated ३१.०५.२००९ अनुसार नक्षलवाद्यांमुळे बाधित झालेले क्षेत्र |
घटकाचा प्रवर्ग | यंत्रसामुग्रीमधील गुंतवूणक |
सुक्ष्म उपक्रम | ₹ २५ लाखापर्यंत |
लघु उपक्रम | ₹ २५ लाख ते ५ कोटीपर्यंत |
मध्यम उपक्रम | ₹ ५ कोटी ते १० कोटीपर्यंत |
मोठे उद्योग | ₹ १० कोटी व त्यापेक्षा जास्त |
खाली दर्शविलेल्या किमान मर्यादांनुसार स्थिर भांडवली गुंतवणूक असलेल्या किंवा प्रत्यक्ष नियमित रोजगार निर्माण करणाऱ्या उत्पादक घटकांना अतिविशाल किंवा विशाल प्रकल्प म्हणून मान्यता देण्यात येते:
प्रवर्ग | गट | स्थिर भांडवली गुंतवणूकीवर आधारीत | रोजगार निर्मितीवर आधारीत |
अति विशाल प्रकल्प | संपूर्ण राज्य | ₹ १५०० कोटींहून अधिक | ३००० पेक्षा जास्त लोकांना रोजगार |
विशाल प्रकल्प | अ व ब | ₹ ७५० कोटींहून अधिक | १५०० पेक्षा जास्त लोकांना रोजगार |
विशाल प्रकल्प | क | ₹ ५०० कोटींहून अधिक | १००० पेक्षा जास्त लोकांना रोजगार |
विशाल प्रकल्प | ड व ड+ | ₹ २५० कोटींहून अधिक | ५०० पेक्षा जास्त लोकांना रोजगार |
विशाल प्रकल्प | विना उद्योग जिल्हा व नक्षलग्रस्त क्षेत्र | ₹ १०० कोटींहून अधिक | २५० पेक्षा जास्त लोकांना रोजगार |
नवीन घटक म्हणजे खाजगी क्षेत्र/सहकारी क्षेत्र/केंद्र अथवा राज्य पुरस्कृत सार्वजनिक क्षेत्र/संयुक्त क्षेत्रातील कोणत्याही तालुक्यामध्ये नव्याने स्थापित होणारा तसेच खालील निकष पूर्ण करणारा घटक
घटक खालील तीन अटींची पूर्तता करत असल्यास:
सुक्ष्म, लघु व मध्यम घटक | ₹ २५ लाखापेक्षा कमी नसावी. |
मोठे उद्योग | ₹ ५०० लाखापेक्षा कमी नसावी |
क, ड, ड+ विना उद्योग जिल्हयातील तसेच नक्षलग्रस्त क्षेत्रातील नवीन अथवा उद्योगांचा विस्तारीकरण / विविधीकरण करण्यासाठी कराव्या लागणा-या दस्तऐवजांवर अनुज्ञेय मुद्रांक शुल्कात सुट देण्यात आली आहे. अ व ब क्षेत्रातील घटकांना खालीलप्रमाणे मुद्रांक शुल्कात सुट देण्यात आली आहे.
घटकाचा प्रकार | मुद्रांक शुल्काची टक्केवारी |
सार्वजनिक उद्यानातील माहिती व जैव तंत्रज्ञान उत्पादक घटकांना | १००% |
खाजगी उद्यानातील माहिती व जैव तंत्रज्ञान उत्पादक घटकांना | ७५% |
विशाल प्रकल्पांना | ५०% |
सामूहिक प्रोत्साहन योजना २०१३ अंतर्गत अंमलबजावणी यंत्रणेकडून पात्रता प्रमाणपत्र प्राप्त केलेला घटक अनुदान दावा सादर करु शकतो. पात्रता प्रमाणपत्रामध्ये नमूद अटी व शर्थींचे पालन पात्र घटकाने करणे अत्यावश्यक आहे.
शासन निर्णय आणि सूचना | |
GR Mega Project Approval - ०५.०३.२०१५ | तपशील पहा |
GR Eligibility to backward integration investment_declaration of incentive period - १२.०९.२०१४ |
तपशील पहा |
PSI Circular No ४ - २६.०८.२०१४ | तपशील पहा |
GR Delegation of power to Principal Secy. (I) to approve Mega projects under PSI - ०७ - १९.०३.२०१४ |
तपशील पहा |
GR Classification of Chincholi area in MIDC in D+ class - ०१.०३.२०१४ | तपशील पहा |
Circular PSI Procedure of issuing Eligibility Certificate LSI - १३.०१.२०१४ | तपशील पहा |
Circular PSI Procedure of issuing Eligibility Certificate for Stamp Duty Exemption - २७.११.२०१३ |
तपशील पहा |
Circular PSI Procedure of issuing Eligibility Certificate MSME - २७.११.२०१३ | तपशील पहा |
GR Modalities for sanction and disbursement of incentives to strengthen MSME and LSI - १९.१०.२०१३ |
तपशील पहा |
GR Modification to IPS GR dt.०३.१२.२००८ - ३०.०८.२०१३ | तपशील पहा |
GR Consideration of investment period of Mega projects under PSI २००७ and २०१३ - १२.०८.२०१३ |
तपशील पहा |
Modalities for sanction and Disbursement of Employer’s contribution to Employees’ Provident Fund (EPF) and Employees’ State Insurance (ESI) Under Para ५.९ of Package Scheme of Incentives २००७ - १२.०८.२०१३ | तपशील पहा |
Corrigendum PSI २०१३ Para ४.७ - २७.०६.२०१३ | तपशील पहा |
GR Recovery of incentives fron closed units under PSI - २५.०६.२०१३ | तपशील पहा |
GR PSI २०१३ - ०१.०४.२०१३ | तपशील पहा |
GR Closure of PSI २००७ - ३०.०३.२०१३ | तपशील पहा |
GR Extension to PSI २००७ - २९.०३.२०१२ | तपशील पहा |
GR Extension to PSI २००७ up to ३१.०३.२०१२ - ३१.०१.२०१२ | तपशील पहा |
GR Extension to PSI २००७ up to ३१.०१.२०१२ - ३०.११.२०११ | तपशील पहा |
GR Modifications of Para १.१ and ५.१० of PSI २००७ - ३१.१०.२०११ | तपशील पहा |
GR Extension to PSI २००७ up to ३०.११.२०११ - ३०.०८.२०११ | तपशील पहा |
GR Extension to PSI २००७ up to ३१.०८.२०११ - ३०.०६.२०११ | तपशील पहा |
GR Modalities for Cleaner Production Measures under PSI २००७ - १८.०६.२०११ | तपशील पहा |
GR Procedural Rule for Change in constitution - १८.०६.२०११ | तपशील पहा |
GR Modalities for Royalty Refund under PSI २००७ - १७.०६.२०११ | तपशील पहा |
GR Extension to PSI २००७ upto ३०.०६.२०११ and change in criteria of Mega Projects - २२.०३.२०११ |
तपशील पहा |
Corrigendum PSI २०१३ Annexure III - २५.१०.२०१० | तपशील पहा |
GR Modifications to para ५.२_५.१(A)_३.६(A)for the yr २०१०-११ - ३१.०७.२०१० | तपशील पहा |
GR Procedural Rules for Disposal of Assets - १८.०७.२०१० | तपशील पहा |
GR Procedural Rule for recovery from closed units under PSI - १२.०७.२०१० | तपशील पहा |
GR Modification to Para ५.८ of PSI २००७ - ०३.०६.२०१० | तपशील पहा |
GR Grant of SCI under PSI२००१ to Malegaon Taluka - २७.१०.२००९ | तपशील पहा |
GR Incentives to Powerloom and Gament Inds.under PSI २००१ - २२.०५.२००९ | तपशील पहा |
GR Electricity Duty exemption to Vidarbha and Marathwada - ०२.०३.२००९ | तपशील पहा |
GR IPS २००७ for Non-Mega Industries - ०४.१२.२००८ | तपशील पहा |
GR IPS २००७ for Mega Industries - ०३.१२.२००८ | तपशील पहा |
GR Status D+_Tal.Malegaon - ३०.०४.२००७ | तपशील पहा |
GR Increase in Project Cost_PSI-१९८८_१९९३ - १९.०४.२००७ | तपशील पहा |
GR PSI - ०१.०४.२००७ | तपशील पहा |