या योजनेतून पुर्वीपासुन आस्तित्वात असलेल्या उद्योग समूहाच्या कार्यक्षमतेत वाढ होणेसाठी जागतिक दर्जाच्या पायाभूत सुविधा- सामायिक सुविधा निर्माण केल्या जातात. या योजने अंतर्गत सदर सुविधा उभारणीसाठी उद्योग व वाणिज्य मंत्रालय, भारत सरकार, नवी दिल्ली यांचेकडून प्रकल्पाच्या ७५ टक्केपर्यंत रक्कम अनुदान स्वरुपात (जास्तीत जास्त ₹ ६० कोटी) उपलब्ध होते. उर्वरीत २५ टक्के रक्कम संबंधित औद्योगिक संस्था तसेच लाभार्थी संस्था यांचे मार्फत उपलब्ध करणे अपेक्षित आहे. सद्यस्थितीत या योजनेतुन महाराष्ट्रात ३ क्लस्टर प्रकल्प कार्यान्वित झाले आहेत. ०२ प्रकल्पांची उभारणी प्रगतीपथावर आहे. प्रकल्पांची बांधणी व अंमलबजावणी विशेष हेतू वाहन (एस.पी.व्ही.) द्वारे करणेत येते.
आय.आय.यू.एस. प्रकल्पांचा तपशिल पुढीलप्रमाणे आहे (रक्कम ₹ कोटीमध्ये):
क्र. | प्रकल्पाचे नाव | मंजूर प्रकल्प किंमत | केंद्र शासनाची मंजूर अनुदान | अंमलबजावणी यंत्रणेचा (एसपीव्ही) सहभाग | केंद्र शासनाचे अनुदान वितरण |
१. | पुणे (पिंपरी-चिंचवड) ऑटो क्लस्टर | ५९.९९ | ४४.९९ | १५.०० | ४४.९९ |
२. | इचलकरंजी टेक्स्टाईल क्लस्टर* | ६५.०७ | ३२.७० | ३२.३७ | ३२.७० |
३. | नाशिक इंजिनिअरींग क्लस्टर | ६७.२६ | ४२.८७ | २४.३९ | ४१.५९ |
४. | ऑटो व इंजिनियरींग क्लस्टर, औरंगाबाद | ८०.९७ | ५५.७० | २५.२७ | ५०.८० |
५. | कोल्हापूर फाऊंड्री अँड इंजिनियरींग क्लस्टर, कोल्हापूर | ४२.६३ | ३०.९२ | ०७.५१ | २७.२७ |
एकूण | ३१५.९२ | २०७.१८ | १०४.५४ | १९७.३५ |
विशिष्ट उत्पादन प्रक्रिये अंतर्गत (उदा. इंजिनिअरिंग क्लस्टर, नाशिक, फाऊंड्री क्लस्टर, कोल्हापूर, टेक्सटाईल क्लस्टर, इचलकरंजी, कोल्हापूर इ.) कार्यरत विशिष्ट क्षेत्रातील आाद्योगिक समूह क्षेत्र.
Content Awaited.
Content Awaited.