राज्याच्या औद्योगिक विकासातून होणाऱ्या आर्थिक फायद्यामध्ये महाराष्ट्रातील स्थानिक लोकांना योग्य हिस्सा मिळावा तसेच स्थानिक लोकांना रोजगार उपलब्ध व्हावा या दृष्टीकोनातून स्थानिक लोकांना नोकऱ्यांमध्ये प्राधान्य देण्याचे धोरण राज्य शासनाने सन १९६८ पासून अवलंबिले आहे. या धोरणाची परिणामकारकपणे अंमलबजावणी करण्यासाठी राज्यशासनाने शासन निर्णय क्रमांक स्था.लो.रो./२००८/प्र.क्र.९३/उद्योग-६, दिनांक १७ नोव्हेंबर, २००८ अन्वये सुधारित कार्यपध्दती जाहिर केली आहे. शासनाच्या धोरणानुसार महाराष्ट्र राज्यामध्ये कमीत कमी १५ वर्षे वास्तव्य असलेली व्यक्ती ही स्थानिक व्यक्ती म्हणून समजली जाते.
या नविन कार्यपध्दतीनुसार:
शासनाच्या स्थानिक लोकांना रोजगार धोरणाची प्रभावी अंमलबजावणी होण्यासाठी व संनियंत्रण करण्यासाठी जिल्हास्तरावर संबंधित जिल्हयाचे जिल्हाधिकारी व राज्यस्तरावर मा.विकास आयुक्त (उद्योग) यांचे अध्यक्षतेखाली समिती स्थापन करण्यात आलेल्या आहेत. सुधारित कार्यपध्दतीनुसार, एखादया उद्योग उपक्रमामध्ये / उद्योगामध्ये स्थानिक लोकांना आवश्यक त्या प्रमाणात रोजगार देण्यामध्ये काही अडचणी असल्यास त्याबाबत जिल्हास्तरीय समितीमध्ये चर्चा करून अडचणीचे निराकरण करणे, ठराविक कौशल्याचे मनुष्यबळ आवश्यक असल्यास, त्यानुसार व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षणविषयक संस्थामध्ये प्रशिक्षणाच्या सोयी उपलब्ध करण्यासाठी आवश्यक ती कार्यवाही करणे किंवा इतर उपाययोजना सुचविणे या महत्वाच्या तरतुदी करण्यात आल्या आहेत.
राज्यस्तरीय समितीचे कार्य जिल्हा पातळीवरील समितीने केलेली कार्यवाही तसेच त्यांचेकडून प्राप्त झालेल्या सूचनांबाबत चर्चा करून निर्णय घेणे तसेच जास्तीत जास्त स्थानिक लोकांना नोकऱ्यांमध्ये घेण्यासाठी उपाययोजना आखणे हे आहे.
Content Awaited.
शासन निर्णय आणि सूचना | |
GR ELP I and II १७.११.२००८ | तपशील पहा |