उद्योजकांना उद्योगाशी निगडीत विविध शासकीय कायदे, नियम व योजनांची माहिती उपलब्ध करुन देणे, सेवेचा दर्जा वाढविणे, उद्योग उभारणीसाठी विविध शासकीय व निमशासकीय संस्थांकडून लागणारे विविध परवाने / निपटारा प्रमाणपत्रे / नाहरकत प्रमाणपत्रे / विविध सेवा इत्यादी बाबत मार्गदर्शन करणे आणि एकाच ठिकाणी या सेवा कालमर्यादेत उपलब्ध करुन देण्याचा उद्देश साध्य होण्याकरीता उपाययोजना करण्याची आवश्यकता होती.
ही उपाय योजना राबविण्यासाठी अभिकरण संस्थेची आवश्यकता असल्याने प्रत्येक जिल्हा उद्योग केंद्रात उद्योग सेतू कार्यान्वीत करण्याची कार्यवाही सुरु करण्यात आली. जिल्हा उद्योग केंद्र, ठाणे येथे सर्व प्रथम प्रायोगिक तत्वावर शासन निर्णय क्र.उसेतू-२००४/प्र.क्र.७३४/उ-२, मंत्रालय, मुंबई-४०० ०३२, दिनांक ३१ जुलै, २००४ नुसार दिनांक १५ ऑगस्ट, २००४ पासून उद्योग सेतू सुरु करण्यात आला.
याच धर्तीवर महसुल विभागाचे मुख्यालय असलेल्या नाशिक, पुणे, नागपूर, अमरावती, औरंगाबाद, नांदेड, तसेच या व्यतिरिक्त औद्योगिक संघटनांनी मागणी केलेल्या सातारा, कोल्हापूर, अहमदनगर, जळगांव, मुंबई (मुं.प्रा.वि.) या जिल्हयांसाठी उद्योग सेतू कक्ष सुरु करण्याकरीता शासन निर्णय क्र. उसेतू-२००९/प्र.क्र.२१९/उद्योग-८, दिनांक २९ ऑगस्ट, २००९ अन्वये तसेच धुळे जिल्हयात शासन निर्णय क्र. उसेतू-२००९/प्र.क्र.२१९/उद्योग-८, दिनांक १९ जुलै, २०१० नुसार उद्योग सेतू कार्यान्वित करण्यात आला आहे. अशा प्रकारी संपूर्ण महाराष्ट्र राज्यात अद्याप पर्यंत एकूण १३ जिल्हा उद्योग केंद्रांमध्ये उद्योग सेतूची स्थापना करण्यात आली आहे.
सदर शासन निर्णयानुसार उद्योग सेतूची कार्यपध्दती व सर्व साधारण व्यवस्थापनाचे नियंत्रण आणि यशस्वी अंमलबजावणी करण्यासाठी उद्योग सेतू कार्यान्वित होणाऱ्या वरील जिल्ह्यात जिल्हास्तरिय समिती काम पाहील व जिल्हास्तरिय समिती जिल्हा उद्योग सेतू सोसायटीची उपसमिती म्हणून काम पाहिल.
उद्योग सेतूवर खालील सेवा उद्योजकांस उपलब्ध करुन देण्यात आल्या आहेत:
अनु.क्र. | विभाग | सेवा |
१. | जिल्हा उद्योग केंद्राच्या १२ सेवा |
|
२. | महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाच्या १२ सेवा |
|
३. | महाराष्ट्र प्रदुषण नियंत्रण मंडळाच्या ३ सेवा |
|
४. | महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी मर्यादित यांच्या ३ सेवा |
|
५. | कामगार आयुक्तालय यांच्या ४ सेवा |
|
६. | बाष्पके संचालनालय यांच्या ५ सेवा |
|
७. | औद्योगिक सुरक्षा व आरोग्य संचालनालयाच्या ४ सेवा |
|
वरील शासन निर्णयानुसार जिल्हापातळीवर जिल्हा उद्योग केंद्रामध्ये उद्योग सेतूवर सेवा उपलब्ध करण्याची कार्यवाही सुरु करण्यात आली आहे.