लुब्रिकेटींग तेल किंवा वंगण प्रोसेसर्स आणि विक्रेत्यांना लुब्रिकेटींग तेल आणि वंगण (प्रक्रिया, पुरवठा आणि वितरण नियमन) आदेश १९८७ नुसार व्यवसाय चालू ठेवण्यासाठी परवाना घ्यावा लागतो. त्यानुसार ज्या व्यक्तीकोणत्याही लुब्रिकेटींग तेल व वंगण याचेउत्पादन,प्रक्रिया, मिसळणे, कंपाउंडींग, पॅकेजिंग, शुद्धीकरण किंवा विक्री करू इच्छितात अशा सर्व व्यक्तींना परवान्यासाठी किंवा त्याच्या नुतनीकरणासाठी विहित उद्योग संचालनालय / संबंधित जिल्हा उद्योग केंद्र / उद्योग सह संचालक, मुंबई यांचेकडे नमुन्यात अर्ज करणे आवश्यक आहे.
Content Awaited.
क्र. | आवश्यक कागदपत्रे |
१. | लुब तेल परवाना नूतनीकरणासाठी विहित नमुन्यातील अर्जासोबत मूळ परवान्याची प्रत जोडणे आवश्यक आहे |
२. | शुल्क ₹ २५/- |
३. | दुकाने व आस्थापना परवाना |
४. | विक्री कर / व्हॅट नोंदणीची प्रत |
५. | महापालिका स्टोरेज परवाना (मालाची साठवण करीत असल्यास) |
६. | जागेचा पुरावा |
७. | महापालिका कर भरल्याची पावती |
८. | मागिल तीन वर्षांचे ताळेबंद |
९. | तेलाच्या अधिकृत विक्रेता कंपनी (उदा.बीपीसीएल / एचपीसीएल किंवा LOCL)ची दोन अद्ययावत खरेदी बिले |
१०. | सर्व भागीदार / संचालक / मालक यांची पत्ता व दूरध्वनी क्रमांकासहीत यादी |
शासन निर्णय आणि सूचना | |
GR Lubricating Oils and Greases - Marathi ०९.१०.२००६ | तपशील पहा |
GR Lubricating Oils and Greases - Marathi ३०.०९.२००६ | तपशील पहा |
GR Lubricating Oils and Greases - Marathi - ०२.११.२००४ | तपशील पहा |
GR Lubricating Oils and Greases - Marathi १३.०९.१९८७ | तपशील पहा |
Lubricating Oils and Greases - Processing Supply and Distribution | तपशील पहा |
वंगण तेल परवाना नुतनीकरणासाठी शासनाला ₹ २५ /- इतकी फी भरावी लागते व हि फी डी. डी. ने भरणा करता येते.
वंगण तेल परवान्याची वैधता ५ वर्षांपर्यंत असते