महाराष्ट्राला जागतिक-स्तरावरील एक सर्व समावेशक वाढीचे स्पर्धात्मक माहिती तंत्रज्ञान / माहिती तंत्रज्ञान सहाय्यभूत सेवा केंद्र म्हणून विकसित करणे आणि राज्याला भारताची बौध्दीक व ज्ञानाची राजधानी म्हणून स्थापित करण्याच्या दृष्टीकोनातून नविन माहिती तंत्रज्ञान व माहिती तंत्रज्ञान सहाय्यभूत सेवा धोरण-२०१५ जाहीर करण्यात आले आहे.
अ.क्र. | पायाभूत सोयी सुविधांचे परीमाण | निकष |
१. | बांधकाम क्षेत्रफळ | माहिती तंत्रज्ञान उद्यानासाठी किमान २०,००० चौ. फूट एवढे बांधकाम क्षेत्रफळ आवश्यक आहे. सदरचा बांधकाम क्षेत्रफळे अतिरिक्त चटई क्षेत्र निर्देशांक (Additional FSI) /विकास हक्काचे हस्तांतरासह (TDR) मूळ चटईक्षेत्र निर्देशकांच्या माध्यमातून पूर्ण करणे आवश्यक राहील. |
२. | बांधकाम क्षेत्राचे विनियोजन/ वापर | पुणे, पिंपरी-चिंचवड, बृहन्मुंबई, ठाणे, नवीमुंबई, कल्याण-डोंबिवली, मीरा-भाईंदर, उल्हासनगर महानगरपालिका आणि अंबरनाथ नगरपरिषद या ठिकाणच्या सार्वजनिक तसेच खाजगी माहिती तंत्रज्ञान उद्याने/ एव्हीजीसी उद्याने यांना एकूण बांधकाम क्षेत्रफळाच्या किमान ८०% क्षेत्र माहिती तंत्रज्ञान / माहिती तंत्रज्ञान सहाय्यभूत सेवांसाठी व उर्वरित कमाल २०% पर्यंत बांधकाम क्षेत्रफळ (पार्किंग क्षेत्र वगळून) पुरक सुविधांसाठी अनुज्ञेय राहील वर नमूद केलेल्या महानगर पालिका व नगर परिषद वगळता राज्यातील इतर सर्व ठिकाणच्या सार्वजनिक तसेच खाजगी माहिती तंत्रज्ञान उद्याने/ एव्हीजीसी उद्याने यांना एकूण बांधकाम क्षेत्रफळाच्या किमान ६०% क्षेत्र माहिती तंत्रज्ञान / माहिती तंत्रज्ञान सहाय्यभूत सेवांसाठी व उर्वरित कमाल ४०% पर्यंत बांधकाम क्षेत्रफळ (पार्किंग क्षेत्र वगळून) पुरक सुविधांसाठी अनुज्ञेय राहील |
३. | विद्युत पुरवठा व्यवस्था व क्षमता | खाजगी माहिती तंत्रज्ञान उद्यानाच्या एकूण बांधकाम क्षेत्राच्या २० वॅट प्रति चौ. फूट या दराने निश्चित करण्यात आलेल्या वीज पुरवठा क्षमतेचे स्वतंत्र सबस्टेशन उद्यानांच्या आवारात उभारुन सदर वीज सबस्टेशनला वीज पुरवठाकरणाऱ्या कंपनीच्या नजीकच्या स्त्रोत्रातून समर्पित विद्युतपुरवठा वाहिनीच्या माध्यमातूनउद्यानाच्या प्रवर्तकास वीज पुरवठा प्राप्त करणे आवश्यक आहे. |
४. | राखीव विद्युत पुरवठा व्यवस्था (Standby Electricity) | वरील मुद्दा क्रं.३ प्रमाणे निशिचत करण्यात आलेल्या एकूण विद्युत पुरवठा क्षमतेच्याकिमान ३० टक्के एवढी राखीव विद्युत निर्मितीची व्यवस्था प्रवर्तकास करणे बंधनकारकआहे. |
५. | जोडणी क्षमता (Connectivity) |
|
६. | वाहनतळ (पार्कींगसाठी) | माहिती तंत्रज्ञान उद्यानाच्या एकूण बांधकाम क्षेत्राच्या अनुषंगाने प्रति १०० चौ.मीटरबांधकाम क्षेत्रासाठी एक वाहन या परिमाणाने वाहनतळ क्षमता उद्यानात उपलब्ध असणेआवश्यक आहे. |
एव्हीजीसी साठी आर्थिक सवलती:
बिझनेस प्रोसेस आऊटसोर्सिंगसाठी आर्थिक सवलती:
माहिती तंत्रज्ञान व माहिती तंत्रज्ञान सहाय्यभूत सेवा धोरण-२००९ मुळे राज्यात माहिती तंत्रज्ञान उद्योगाने केलेली प्रगती:
२००३-०४ | २००५-०६ | २००६-०७ | २००७-०८ | २००८-०९ | २००९-१० | २०१०-११ | २०११-१२ | २०१२-१३ |
८५१८ | १३६१५ | २०७०२ | ३५७०४ | ४२९८० | ४५७०९ | ४९८७३ | ४६२६२ | ४९७९६ |
शासन निर्णय आणि सूचना | |
IT/ITES Policy २०१५ | तपशील पहा |
GR IT/ITES Policy २५.०८.२०१५ | तपशील पहा |
Stamp Duty Exemption - Application Form | तपशील पहा |
Stamp Duty Exemption - Required Documents | तपशील पहा |
Electricity Duty Exemption Affidavit | तपशील पहा |
Electricity Duty Exemption - Application Format | तपशील पहा |
Electricity Duty Exemption - Required Documents | तपशील पहा |
Employment of Local Person - १ | तपशील पहा |
Employment of Local Person - २ | तपशील पहा |
Eligibility, Terms & Conditions for concessions in Stamp Duty to I.T Units - १०.०६.२०१५ |
तपशील पहा |
IT Policy २००९ Extn March २०१५ | तपशील पहा |
GR IE and LD - २८.०५.२०१४ | तपशील पहा |
Electricity Duty Exemption Circular - २४.०२.२०१४ | तपशील पहा |
Stamp Duty Exemption Circular - ०९.०५.२०१२ | तपशील पहा |
मराठी माहिती तंत्रज्ञान व माहिती तंत्रज्ञान सहाय्यभूत सेवा धोरण-२००९ - २९.०८.२००९ | तपशील पहा |
GR IELD - २४.०८.२००९ | तपशील पहा |
GR IELD - १३.०८.२००८ | तपशील पहा |
GR IELD - ०५.०८.२००८ | तपशील पहा |
GR IELD - ०६.०६.२००८ | तपशील पहा |
Status at par with IT/ITES Units - ०३.०३.२००७ | तपशील पहा |
GR IELD - ०२.०२.२००७ | तपशील पहा |
GR IE and LD - २६.०५.२००६ | तपशील पहा |
GR IE and LD - २४.११.२००५ | तपशील पहा |
GR IELD - १०.०६.२००५ | तपशील पहा |
IT Unit Registration Procedure - ०७.०५.१९९९ | तपशील पहा |
माहिती तंत्रज्ञान/ माहिती तंत्रज्ञान सहाय्यभूत सेवा धोरण - २०१५ च्या संदर्भात, माहिती तंत्रज्ञान उपक्रम/घटक यांची व्याख्येत खाली नमूद केल्याप्रमाणे माहिती तंत्रज्ञान सॉफ्टवेअर, माहिती तंत्रज्ञान हार्डवेअर, आणि मा. तं. सहाय्यभूत सेवा यांचा समावेश होतो:
माहिती तंत्रज्ञान सॉफ्टवेअर म्हणजे स्रोत संकेतांक किंवा वस्तु संकेतांकासह सूचना, माहिती, ध्वनी किंवा प्रतिमा यांचे कोणतेही अभिवेदन, ज्यात वरील बाबींची नोंद यंत्राने वाचण्यायोग्य स्वरुपात करणे आणि ज्यात उपयोगकर्त्यास कोणतेही परस्पर संस्करण संगणकाच्या माध्यमातून करता येणे.
माहिती तंत्रज्ञान हार्डवेअरमध्ये उद्योग संचालनालयाने वेळोवेळी अधिसूचित केलेल्या उत्पादनांचा समावेश असेल. त्यांची सूचक यादी परिशिष्ट-अ मध्ये देण्यात आली आहे.
मा. तं. सहाय्यभूत सेवा म्हणजे केंद्रीय प्रत्यक्ष कर मंडळाने (Central Board of Direct Taxes) आयकर कायदयाच्या कलम १०(टीअ) अन्वये निर्देशित केलेल्या सेवा असतील आणि त्यामध्ये खालील सेवांचा समावेश असेल:
माहिती तंत्रज्ञान उद्यानाकरिता विहित केलेले खालील निकष आणि अटी व शर्तीची पूर्तता करण्यासाठी उद्यानाच्या व्यवस्थापनाबाबत कायदेशीर जबाबदार संस्था, उद्यानाचे प्रवर्तक किंवा विकासक अर्ज करण्यास पात्र आहेत:
अ.क्र. | पायाभूत सोयी सुविधांचे परीमाण | निकष |
१. | बांधकाम क्षेत्रफळ | माहिती तंत्रज्ञान उद्यानासाठी किमान २०,००० चौ. फूट एवढे बांधकाम क्षेत्रफळ आवश्यक आहे. सदरचा बांधकाम क्षेत्रफळे अतिरिक्त चटई क्षेत्र निर्देशांक (Additional FSI) /विकास हक्काचे हस्तांतरासह (TDR) मूळ चटईक्षेत्र निर्देशकांच्या माध्यमातून पूर्ण करणे आवश्यक राहील. |
२. | बांधकाम क्षेत्राचे विनियोजन/ वापर | पुणे, पिंपरी-चिंचवड, बृहन्मुंबई, ठाणे, नवीमुंबई, कल्याण-डोंबिवली, मीरा-भाईंदर, उल्हासनगर महानगरपालिका आणि अंबरनाथ नगरपरिषद या ठिकाणच्या सार्वजनिक तसेच खाजगी माहिती तंत्रज्ञान उद्याने/ एव्हीजीसी उद्याने यांना एकूण बांधकाम क्षेत्रफळाच्या किमान ८०% क्षेत्र माहिती तंत्रज्ञान / माहिती तंत्रज्ञान सहाय्यभूत सेवांसाठी व उर्वरित कमाल २०% पर्यंत बांधकाम क्षेत्रफळ (पार्किंग क्षेत्र वगळून) पुरक सुविधांसाठी अनुज्ञेय राहील. वर नमूद केलेल्या महानगर पालिका व नगर परिषद वगळता राज्यातील इतर सर्व ठिकाणच्या सार्वजनिक तसेच खाजगी माहिती तंत्रज्ञान उद्याने/ एव्हीजीसी उद्याने यांना एकूण बांधकाम क्षेत्रफळाच्या किमान ६०% क्षेत्र माहिती तंत्रज्ञान / माहिती तंत्रज्ञान सहाय्यभूत सेवांसाठी व उर्वरित कमाल ४०% पर्यंत बांधकाम क्षेत्रफळ (पार्किंग क्षेत्र वगळून) पुरक सुविधांसाठी अनुज्ञेय राहील. |
३. | विद्युत पुरवठा व्यवस्था व क्षमता | खाजगी माहिती तंत्रज्ञान उद्यानाच्या एकूण बांधकाम क्षेत्राच्या ६ वॅट प्रति चौ. फूट या दराने निश्चित करण्यात आलेल्या वीज पुरवठा क्षमतेचे स्वतंत्र सबस्टेशन उद्यानांच्या आवारात उभारुन सदर वीज सबस्टेशनला वीज पुरवठा करणाऱ्या कंपनीच्या नजीकच्या स्त्रोत्रातून समर्पित विद्युत पुरवठा वाहिनीच्या माध्यमातून उद्यानाच्या प्रवर्तकास वीज पुरवठा प्राप्त करणे आवश्यक आहे. |
४. | राखीव विद्युत पुरवठा व्यवस्था (Standby Electricity) | वरील मुद्दा क्र. ३ प्रमाणे निश्चित करण्यात आलेल्या विद्युत पुरवठा क्षमतेच्या किमान ३० टक्के एवढी राखीव विद्युत निर्मितीची व्यवस्था प्रवर्तकास करणे बंधनकारक आहे. |
५. | जोडणी क्षमता (Connectivity) |
|
६. | वाहनतळ (पार्कींगसाठी) | माहिती तंत्रज्ञान उद्यानाच्या एकूण बांधकाम क्षेत्राच्या अनुषंगाने प्रति १०० चौ. मी. बांधिव क्षेत्रासाठी एक वाहन या परिमाणाने वाहनतळ क्षमता उद्यानात उपलब्ध असणे आवश्यक आहे. |
खाजगी माहिती तंत्रज्ञान उद्यानाची उभारणी वरील निकषांची पूर्तता करणारी कोणती व्यक्ती/ संस्था जसे मालकी/ भागीदारी संस्था / खाजगी मर्यादितकंपनी/ सार्वजनिक कंपनी/ सार्वजनिक मर्यादित कंपनी/ सहकारी संस्था अथवा ट्रस्ट इत्यादी.
होय. माहिती तंत्रज्ञान उद्यानाची उभारणी परदेशी कंपनी करु शकते.
माहिती तंत्रज्ञान उद्यानाची उभारणी करु इच्छित असलेल्या विकासक/ प्रवर्तक यांनी विहित नमुन्यातील अर्जासोबत खालील कागदपत्रे जोडावीत:
माहिती तंत्रज्ञान उद्यानासाठी इरादापत्र घेऊनही ५ वर्षाहून अधिक काळात प्रकल्प पूर्ण करुन नोंदणी न घेऊ शकलेल्या विकासक/ प्रवर्तक यांनी विहित नमुन्यातील अर्जासोबत खालील कागद पत्रे जोडून सक्षम प्राधिकाऱ्याकडे अर्ज सादर करावा:
विकासकाने नियोजित प्राधिकरणाकडून भोगवटा प्रमाणपत्र प्राप्त करुन माहिती तंत्रज्ञान उद्यानामध्ये ५० टक्क्यांहून अधिक माहिती तंत्रज्ञान/ माहिती तंत्रज्ञान सहाय्यभूत सेवा घटक स्थापित झाल्यानंतर नोंदणी प्राधिकाऱ्याकडे विहित नमुन्यातील अर्जासोबत खालील कागदपत्रे सादर करावीत.
अ.क्र. | माहिती तंत्रज्ञान उद्यानाचे ठिकाण | नोंदणी प्राधिकारी |
१. | बृहन्मुंबई महानगर पालिकाक्षेत्रात | विकास आयुक्त (उद्योग), उद्योग संचालनालय, मुंबई. |
२. | उर्वरित महाराष्ट्र | संबंधित महाव्यवसथापक, जिल्हा उद्योग केंद्र |
उद्योग संचालनालयाने विहित केलेल्या नमुन्यातील सहामाही अहवाल विकासकाने उद्योग संचालनालय व संबंधित नियोजन प्राधिकारी यांस सादर करणे अनिवार्य आहे.
माहिती तंत्रज्ञान घटकांना इरादापत्र मिळण्यासाठी सक्षम प्राधिकाऱ्याकडे विहित नमुन्यातील अर्जासह खालील कागदपत्रासह अर्ज सादर करणे आवश्यक आहे.
अ.क्र. | माहिती तंत्रज्ञान घटकाचा प्रकार | नोंदणी प्राधिकारी |
१. | मोठे घटक |
(त्यांच्या अधिकार क्षेत्रात) |
२. | मुंबई प्राधिकरण विभागातील महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळातील सुक्ष्म, लघु, मध्यम आणि मोठे घटक | तांत्रिक सल्लागार |
३. | वरील विभागाव्यतिरिक्त क्षेत्रातील सुक्ष्म, लघु आणि मध्यम घटक |
(त्यांच्या अधिकार क्षेत्रात) |
४. | विशेष आर्थिक क्षेत्रातील घटक | विकास आयुक्त (सेझ) |
५. | सॉफ्टवेअर सुक्ष्म, लघु आणि मध्यम घटक | संचालक, सॉफ्टवेअर टेक्नॉलॉजी पार्क्स ऑफ इंडिया (एसटीपीआय) नवी मुंबई, पुणे |
माहिती तंत्रज्ञान घटकांनी सक्षम प्राधिकाऱ्याकडून नोंदणी घेतल्यानंतर खालीलप्रमाणे सवलती अनुज्ञेय असतील:
सार्वजनिक व खाजगी माहिती तंत्रज्ञान उद्यानाना मूळ चटईक्षेत्र निर्देशांक १.०० पेक्षा जास्त असला तरी १००% अथवा २००% अतिरिक्त चटईक्षेत्र निर्देशांक धरुन एकूण चटईक्षेत्र निर्देशांक ३.०० पेक्षा जास्त अनुज्ञेय असणार नाही इतका अतिरिक्त चटईक्षेत्र निर्देशांक उपलब्ध करुन देण्यात येईल.
माहिती तंत्रज्ञान घटक:
माहिती तंत्रज्ञान घटकांना इरादापत्र/ नोंदणी देण्यासाठी शुल्क आकारले जात नाही. तसेच माहिती तंत्रज्ञान घटकांना इरादापत्र/ नोंदणी साठी जेथे सेतु कार्यप्रणाली आहे तेथे सेतुशुल्क भरण्यात यावे
माहिती तंत्रज्ञान उद्यान:
माहिती तंत्रज्ञान उद्यानाच्या इरादापत्रासाठी/ De-novo इरादापत्रासाठी/ इरादापत्राच्या मुदतवाढीसाठी/ शुध्दीपत्रासाठी/ नोंदणीसाठी अर्जासोबत रुपये ५०००/- एवढे शुल्क पुढील लेखाशिर्षाखाली प्रवर्तकांनी भरणा केल्याचे रिझर्व्ह बँकेच्या चलनाची प्रत जोडण्यात यावी:
“०८५१ Village & Small Industries १०२,
Small Scale Industries
Cottage & Small Industries
०८५१-००२-६”
क्षेत्र | माहिती तंत्रज्ञान / माहिती तंत्रज्ञान सहाय्यभूत सेवा घटक | माहिती तंत्रज्ञान सहाय्यभूत सेवा |
पुणे, पिंपरी-चिंचवड, बृहन्मुंबई, ठाणे, नवीमुंबई, कल्याण-डोंबिवली, मीरा-भाईंदर, उल्हासनगर महानगरपालिका आणि अंबरनाथ नगरपरिषद | ८०% | २०% |
उर्वरित महाराष्ट्र | ६०% | ४०% |
पूरक सुविधा म्हणजे माहिती तंत्रज्ञान व्यवसाय करण्यासाठी पूरक ठरणाऱ्या सुविधा होय, ज्यामध्ये पुढील बाबींचा अंतर्भाव नसेल.
Support services means services provided in relation to conduct of IT / ITES business, which shall exclude:
वर व्याख्या करण्यात आलेल्या पूरक सेवा / सुविधा या अस्तिवातील माहिती तंत्रज्ञान उद्यानांना सुध्दा अनुज्ञेय असतील.
माहिती तंत्रज्ञान उद्यानांना अतिरीक्त चटई क्षेत्र निर्देशाकासाठी ना-हरकत प्रमाणपत्र मिळण्यासाठी विनंती अर्जासह खालील कागदपत्रे सादर करावीत:
खाजगी माहिती तंत्रज्ञान उद्यानांना दिलेल्या इरादा पत्र/ नोंदणी प्रमाणपत्रातील नाव/ बांधकाम क्षेत्रफळ इ. संदर्भात सुधारणा करण्यासाठी विनंती अर्जासह खालील कागदपत्रे सादर करावीत :
खाजगी माहिती तंत्रज्ञान उद्यानांना दिलेल्या इरादा पत्राची मुदतवाढ देण्यासाठी विनंती अर्जासह खालील कागदपत्रे सादर करावीत:
माहिती तंत्रज्ञान/माहितिी तंत्रज्ञान सहाय्यभुत सेवा घटकांना मुद्रांक शुल्क सवलत पात्रता प्रमाणपत्र मिळण्यासाठी विहित नमुन्यातील अर्जासह खालील कागदपत्रे सक्षम प्राधिकाऱ्याकडे सादर करावीत:
माहिती तंत्रज्ञान/माहितिी तंत्रज्ञान सहाय्यभुत सेवा घटकांना विद्युत शुल्क सवलत पात्रता प्रमाणपत्र मिळण्या मिळण्यासाठी विहित नमुन्यातील अर्जासह खालील कागदपत्रे सक्षम प्राधिकाऱ्याकडे सादर करावीत:
अ.क्र. | माहिती तंत्रज्ञान घटकाचा प्रकार | नोंदणी प्राधिकारी |
१. | मोठे घटक |
|
२. | वरील विभागाव्यतिरिक्त क्षेत्रातील सुक्ष्म, लघु आणि मध्यम घटक |
|
३. | विशेष आर्थिक क्षेत्रातील सर्व माहिती तंत्रज्ञान घटक | उद्योग सह संचालक/विशेष कार्य अधिकारी (माहिती तंत्रज्ञान), उद्योग संचालनालय, मुंबई |