वर जा

पंत प्रधान रोजगार निर्मिती कार्यक्रम (PMEGP)

  • परिचय
  • पात्रता अटी
  • अंमलबजावणी
  • सांख्यिकी
  • सूचना
  • एफ.ए.क्यू

परिचय

केंद्र शासनाने पंतप्रधान रोजगार निर्मिती कार्यक्रम येाजना आणि ग्रामीण रोजगार निर्मिती योजना या दोन योजना एकत्रित करुन पंतप्रधान रोजगार निर्मिती कार्यक्रम (पीएमईजीपी) १५ ऑगस्ट २००८ पासून जाहीर केली आहे. सदर योजनेचा मुख्य उद्देश हा स्वयंरोजगार उभारणीस प्रोत्साहन देण्यासाठी सुलभ तत्वावर भांडवल उभारणी करुन देणे हा आहे. राज्यात राष्ट्रीयकृत बँकां मार्फत सदर योजनेअंतर्गत अर्थसहाय्य उपलब्ध करुन देण्यात येते. यासाठी खादी ग्रामोद्योग आयोग, खादी ग्रामोद्योग मंडळ व जिल्हा उद्योग केंद्र या तीन यंत्रणेमार्फत योजनेची अंमलबजावणी करण्यात येते. राज्य खादी ग्रामोद्योग आयोग, मुंबई सदर योजनेसाठी नोडल एजन्सी म्हणून काम करते.

योजनेअंतर्गत सुविधा

उत्पादित उद्योग घटकांना कमाल ₹ २५ लाखापर्यंत तसेच व्यवसाय-सेवा उद्योग घटकांना कमाल ₹ १० लाखापर्यंतचे अर्थसहाय्य बँकामार्फत केले जाते. उद्योग घटकास ५ ते १० टक्के रक्कम स्वगुंतवणूक करावी लागते. बँकेचा कर्ज समभाग ९० ते ९५ पर्यंत असतो. संक्षिप्त विवरण खालीलप्रमाणे आहे.


प्रवर्ग लाभार्थ्याचे भांडवल मार्जीन मनी (अनुदान)
-- शहरी भागासाठी ग्रामीण भागासाठी
सर्वसाधारणगट १०% १५% २५%
अनु.जाती / जमाती / इतर मागासवर्गीय जाती / अल्पसंख्याक / माजीसैनिक / महिला/ अपंग ५% २५% ३५%

पात्रता अटी

योजनेअंतर्गत पात्रता अटी:

  • अर्जदाराचे वय कमीत कमी १८ पूर्ण असावे.
  • उत्पन्नाची अट नाही.
  • योजनअंतर्गत रक्कम ₹ ५ ते २५ लाखापर्यंतचा लाभ घेण्यासाठी अर्जदाराचे शिक्षण किमान ८ वी पास असणे अनिर्वाय आहे.
  • वैयक्तिक लाभार्थी, स्वंयसहायता बचत गट, सहकारी सोसायटया, उत्पादीत सह सोसायटी, चॅरीटेबल ट्रस्ट इ. सदर योजनेचा लाभ घेण्यास पात्र आहेत.
  • सदर योजनेअंतर्गत फक्त नवीन प्रकल्पाकरिताच अर्थसहाय्य केले जाते. यापूर्वी स्थापित घटकांना लाभ घेता येत, नाही.
  • योजनेचा लाभ मिळण्यास पात्र होण्यासाठी लाभार्थीने किंवा त्याच्या कुटुंबातील इतर सदस्यांनी यापूर्वी इतर कोणत्याही शासकीय अनुदानाचा लाभ घेतलेला नसावा. त्याचप्रमाणे ते कोणत्याही बँकेचे थकबाकीदार नसावे.

अंमलबजावणी

सदर योजनेसाठीचा यंत्रणेनिहाय लक्षांक व मार्जिन मनी निधी केंद्र शासनाकडून खादी ग्रामोद्योग आयोग या नोडल एजन्सीकडे प्राप्त होतो. नोडल एजन्सीमार्फत सदर प्रकल्प लक्षांक व मार्जिन मनी निधी प्रत्येक यंत्रणेला वाटप केला जातो. यंत्रणेमार्फत त्यांच्या अधिपत्याखाली असलेल्या सर्व जिल्हा कार्यालयास लक्षांक वाटप करण्यात येतो.

संबधित जिल्हा कार्यालयामार्फत जिल्ह्यास दिलेल्या लक्षांकाच्या दीड ते दोन पट अर्ज स्विकारण्यात येतात. प्राप्त अर्जांची छाननी योजनेच्या मार्गदर्शक तत्वानुसार केली जाते. सर्व प्रस्तावास e-tracking ID क्रमांक दिला जातो. पात्र ठरलेले अर्ज जिल्हाधिकारी यांचे अध्यक्षतेखाली गठीत केलेल्या जिल्हा कार्यबल समितीच्या शिफारशीने संबंधित जिल्हा स्तरीय बँकेकडे पाठविले जातात. बँकेने कर्ज मंजूर केल्यानंतर व लाभार्थीने आवश्यक कागदपत्रांची प्रक्रिया पूर्ण केल्यानंतर बँक लाभार्थ्यास कर्जवितरण करते. बँक कर्ज परतफेडीचा कालावधी ३-७ वर्षापर्यंतचा असतो. बँक कर्जाचा व्याजदर प्रचलित दराप्रमाणे (Normal interest) असतो. कर्ज मंजूरीनंतर व वाटपापूर्वी लाभार्थ्यास संबंधित व्यवसायाचे उद्योजकीय प्रशिक्षण (EDP Training) घेणे अनिर्वाय आहे. लाभार्थ्यास कर्जाचा पहिला हप्ता वाटप केल्यानंतर नोडल बँकेत मार्जिन मनी अनुदानासाठी प्रकरण पाठविले जाते. तदनंतर मार्जिन मनी (अनुदान) नोडल बँकेकडून कर्ज देणा-या बँकेस वितरीत करण्यात येते.

वितरीत करण्यात आलेले मार्जिन मनी (अनुदान) लाभार्थीचे नांवे ३ वर्षाकरिता टिडीआर (टर्म डिपॉझिट रिसीट) मध्ये डिपॉझिट करण्यात येते. तीन वर्षानंतर आवश्यक ती खात्री केल्यानंतर मार्जिन मनी रक्कम कर्ज खात्यात वळती केली जाते. याप्रकारे लाभार्थीस त्याच्या उद्योग व्यवसायासाठी कर्ज सुविधा तसेच अनुदान सुविधा उपलब्ध करण्यात येते.

सांख्यिकी

पंतप्रधान रोजगार निर्मिती कार्यक्रम योजनेची वर्षनिहाय (एकत्रित केव्हीआयसी/केव्हीआयबी/डीआयसी यंत्रणा) प्रगती (₹ लाखात):

वर्ष लक्षांक मंजूर प्रकरणे अनुदान वितरीत प्रकरणे
प्रकल्प संख्या मार्जिन मनी रक्कम रोजगार निर्मिती प्रकल्प संख्या मार्जिन मनी रक्कम प्रकल्प संख्या मार्जिन मनी रक्कम रोजगार निर्मिती
२००८-०९ ५५२६ ६६२८.८९ ५५२७३ ३३७६
६१%
४२३५.२४
६४%
१६८८
३१%
२२६८.३९
३४%
१३३०३
२४%
२००९-१० ८८७२ ९९००.०७ ८२५०१ ७९६८
९०%
९७७६.०५
९९%
४२१८
४८%
५७७२.७४
५८%
३१४९४
३८%
२०१०-११ ३४१५ ४७७९.८० ३४१५० ६१३१
१८०%
८२५९.४८
१७३%
३८९८
११४%
५१३२.८८
१०७%
३१७५२
९३%
२०११-१२ ३३७९ ४७३०.१४ ३३७९० ५४६६
१६२%
९५५७.४२
२०२%
२६२४
७८%
४४३७.२३
९४%
२०६२२
६१%
२०१२-१३ २९८० ६८६५.५३ २३८४० ४१५४
१३९%
७०८७.४४
१०३%
३६१७
१२१%
६८२८.२३
९९%
२२७३६
९५%
२०१३-१४ ४९८१ ६६४८.८७ ३९८४८ ३९७०
८०%
८४१९.७६
१२७%
२१८३
४४%
४७३७.६३
७१%
१५५६१
३९%
२०१४-१५ ५६२३ ७८२३.२७ ४४९८४ ५२५१
९३%
१०९४८.४८
१४०%
३२३९
५८%
७२५५.१५
९३%
१४३८०
३२%
Total ३४७७६ ४७३७६.५७ ३१४३८६ ३६३१६
१०४%
५८२८३.८७
१२३%
२१४६७
६२%
३६४३२.२५
७७%
१४९८४८
४८%

टिप:

सरासरी मा.म. अनुदान: ₹ १.७० लाख प्रति प्रकल्प

सरासरी रोजगार निर्मिती: ७ व्यक्ती प्रति प्रकल्प


पंतप्रधान रोजगार निर्मिती कार्यक्रम योजनेची वर्षनिहाय (डीआयसी यंत्रणा) प्रगती (₹ लाखात):

वर्ष लक्षांक मंजूर प्रकरणे अनुदान वितरीत प्रकरणे
प्रकल्प संख्या मार्जिन मनी रक्कम रोजगार निर्मिती प्रकल्प संख्या मार्जिन मनी रक्कम प्रकल्प संख्या मार्जिन मनी रक्कम रोजगार निर्मिती
२००८-०९ २२१० २६५१.५७ २२०९६ १५११
६८%
१७०९.०८
६४%
४०८
१८%
५७५.३८
२२%
२८३२
१३%
२००९-१० ३८१३ ३७९९.५१ ३१६६३ ४४८९
११८%
४९१६.०३
१२९%
२४५६
६४%
२९२१.२३
७७%
१३६९१
४३%
२०१०-११ १३७० १९१७.५२ १३७०० ३१२३
२२८%
४३३४.१९
२२६%
१५३८
११२%
२०६३.०५
१०८%
८३३९
६१%
२०११-१२ १३५१ १८९२.०५ १३५१० ३६८०
२७२%
५७५२.५७
३०४%
११९२
८८%
१८७२.०९
९९%
७४६४
५५%
२०१२-१३ ११९६ २७५०.२० ९५६८ २७०५
२२६%
४३१८.८७
१५७%
२२०३
१८४%
३८५४.२७
१४०%
१३८२३
१४४%
२०१३-१४ २०३७ २५६८.६१ १६२९६ १७३७
८५%
३९३५.४२
१५३%
८९२
४४%
१९००.८२
७४%
६६७६
४१%
२०१४-१५ २४६३ ३४१५.६४ १९७०४ २४९३
१०१%
५१७२.०९
१५१%
१४७४
६०%
३४१९.०९
१००%
६६७६
३४%
Total १४४४० १८९९५.१० १२६५३७ १९७३८
१३७%
३०१३८.२५
१५९%
१०१६३
७०%
१६६०५.९३
८७%
५९५०१
४७%

टिप:

सरासरी मा.म. अनुदान: ₹ १.७० लाख प्रति प्रकल्प

सरासरी रोजगार निर्मिती: ७ व्यक्ती प्रति प्रकल्प


शासन निर्णय आणि सूचना
PMEGP Guidelines २००८ तपशील पहा
Increase in limit of collateral free loan from ₹ ५ lakhs to ₹ १० Lakhs २०१० - २६.०७.२०१० तपशील पहा
GR PMEGP २००८ - १८.०८.२००८ तपशील पहा

एफ.ए.क्यू - पंत प्रधान रोजगार निर्मिती कार्यक्रम (PMEGP)


सदर योजनेचा लाभ घेण्याची प्रक्रिया कशी आहे?

सदर योजनेची अंमलबजावणी राज्यातील सर्व जिल्हा उद्योग केंद्र , खादी ग्रामोद्योग आयोग, महाराष्ट्र राज्य खादी व ग्रामोद्योग मंडळ यांचेमार्फत जिल्ह्यास लक्षांक प्राप्त झाल्यानंतर दरवर्षी साधारणत: एप्रिल महिन्यात कालबध्द कार्यक्रमप्रणालीने सुरु होते. संबधित जिल्हा कार्यालयामार्फत जिल्ह्यास दिलेल्या लक्षांकानुसार अर्ज स्विकारण्यात येतात. योजनेच्या मार्गदर्शक तत्वानुसार प्राप्त अर्जांची छाननी केली जाते. व सर्व अर्जांना ई-ट्रेकिंग नंबर दिला जातो. छाननीत पात्र ठरलेले अर्ज जिल्हाधिकारी यांचे अध्यक्षतेखाली गठीत केलेल्या जिल्हा कार्यबल समितीपुढे मंजूरीसाठी ठेवले जातात. मंजूर झालेले अर्ज जिल्हा स्तरीय राष्ट्रीयकृत बँकेकडे पाठविले जातात. बँकेने कर्ज मंजूर केल्यानंतर व लाभार्थीने आवश्यक कागदपत्रांची प्रक्रिया पूर्ण केल्यानंतर तसेच उद्योजकीय प्रशिक्षण (EDP) घेतलेले प्रमाणपत्र संबंधित बँकेस सादर केल्यानंतर बँक लाभार्थ्यास कर्जाचा पहिला हप्ता वाटप करते. व देय अनुदान (मार्जिन मनी) तत्सम नोडल बँकेकडून मागवून घेते.

पंतप्रधान रोजगार निर्मिती कार्यक्रम योजनेचा लाभ घेण्याकरिता सर्वसाधारण आवश्यक पात्रता काय असावी?
  1. अर्जदाराचे वय कमीत कमी १८ पूर्ण असावे.
  2. उत्पन्नाची अट नाही.
  3. योजनअंतर्गत रक्कम ₹ ५ ते २५ लाखापर्यंतचा लाभ घेण्यासाठी अर्जदाराचे शिक्षण किमान ८ वी पास असणे अनिर्वाय आहे.
  4. वैयक्तिक लाभार्थी, स्वंयसहायता बचत गट, सहकारी सोसायटया, उत्पादीत सह सोसायटी, चॅरीटेबल ट्रस्ट इ. सदर योजनेचा लाभ घेण्यास पात्र आहेत.
  5. सदर योजनेअंतर्गत फक्त नवीन प्रकल्पाकरिताच अर्थसहाय्य केले जाते. यापूर्वी स्थापित घटकांना लाभ घेता येत, नाही.
  6. योजनेचा लाभ मिळण्यास पात्र होण्यासाठी लाभार्थीने किंवा त्याच्या कुटुंबातील इतर सदस्यांनी यापूर्वी इतर कोणत्याही शासकीय अनुदानाचा लाभ घेतलेला नसावा. त्याचप्रमाणे ते कोणत्याही बँकेचे थकबाकीदार नसावे.
या योजनेचा लाभ घेण्याकरिता अर्ज कोठे व कसा करावा?

पंतप्रधान रोजगार निर्मिती कार्यक्रम ही योजना केंद्र शासन पुरस्कृत असून राज्यात खादी व ग्रामोद्योग आयोग (ग्रामीण भागात) , महाराष्ट्र राज्य खादी व ग्रामेाद्योग मंडळ (ग्रामीण भागात) व जिल्हा उद्योग केंद्र (शहरी व ग्रामीण भाग) या तीन यंत्रणेमार्फत राबविण्यात येते. या योजनेचा लाभ घेण्याकरिता ठरवून दिलेल्या कालावधीत अर्जदार ऑनलाईन www.pmegp.in किंवा www.kvic.org.in या वेबसाईटवर अर्ज भरु शकतो. त्याचप्रमाणे या तिनही यंत्रणेच्या कार्यालयात निश्चित केलेल्या कालबध्द कार्यक्रमानुसार योजनेचे अर्ज वाटप केले जातात व स्विकारले जातात.

या योजनेअंतर्गत लाभार्थ्यांस कशाप्रकारे व किती अर्थसहाय्य उपलब्ध होईल याबाबत माहिती मिळेल काय?

सदरची योजना राज्यात सर्व जिल्ह्यातील राष्ट्रीयकृत बँकेच्या सहाय्याने राबविली जाते. योजनेच्या मार्गदर्शक तत्वानुसार तसेच लाभार्थीच्या व्यवसाय निवडीच्या पात्रतेनुसार कर्जप्रकरण मंजूर/ नामंजूर करण्याचे अधिकार कर्ज पुरवठा करणा-या बँकेला आहे. योजनेअंतर्गत सेवा उद्योग प्रकल्पाकरिता कमाल कर्ज रक्कम ₹ १० लाख व उत्पादन प्रकल्पाकरिता कमाल कर्ज रक्कम ₹ २५ लाख पर्यंतचे कर्ज बँकेमार्फत्‍ भारतीय रिझर्व्ह बँकेच्या मार्गदर्शक तत्वानुसार चालू व्याजदराने मंजूर केले जाते. कर्जाची परतफेड ३ ते ७ वर्षामध्ये करावयाची आहे.

या योजनेमध्ये शासनातर्फे कशाप्रकारे व किती अनुदान देय आहे?

या योजनेमार्फत प्रवर्गानिहाय खालीलप्रमाणे अनुदान देय आहे.


प्रवर्ग लाभार्थ्याचे स्वत:चा हिस्सा मार्जीन मनी (अनुदान) बँकेने एकुण मंजूर केलेल्या प्रकल्प किंमतीवर
-- शहरी भागासाठी ग्रामीण भागासाठी
सर्वसाधारणगट १०% १५% २५%
अनु.जाती / जमाती / इतर मागासवर्गीय जाती / अल्पसंख्याक / माजीसैनिक / महिला/ अपंग ५% २५% ३५%

वाटप करण्यात आलेली मार्जिन मनीची रक्कम (अनुदान) लाभार्थीच्या नांवे तत्सम कर्जपुरवठा करणा-या बँकेत ३ वर्षाकरिता टिडीआर (टर्म डिपॉझिट रिसीट) मध्ये डिपॉझिट करण्यात येते. सदर रकमेवर व्याज दिले जात नाही. तसेच तेवढयाच रकमेवर व्याज आकारले जात नाही. कर्ज वाटपानंतर कमीत कमी तीन वर्ष लाभार्थीने आपला उद्योग व्यवसाय यशस्वीपणे चालविणे आवश्यक आहे. तीन वर्षानंतर त्रयस्थ संस्थेमार्फत घटकाची भौतिक तपासणी केली जाते. व त्या तपासणीच्या समाधानकारक अहवालाच्या आधारेच अनुदानाची रक्कम लाभार्थ्यांस अदा करण्यात येते. तीन वर्षापर्यंत जर लाभार्थीने व्यवसाय सुरु न केल्यास, व्यवसाय बंद केल्यास, बँकेचे थकबाकीदार झाल्यास, इत्यादी परिस्थितीत लाभार्थ्यांस अनुदानाचा थेट लाभ देता येत नाही.

ह्या योजनेंतर्गत महिला व मागासवर्गीय, अपंग, अल्पसंख्याक लाभार्थ्यास काही विशेष सवलती/ आरक्षण/ प्राधान्य देण्यात आले आहे काय?

ही योजना केंद्र शासन पुरस्कृत असून त्यामध्ये अनुसूचित जाती प्रवर्गाकरिता-१५%, अनु. जमाती प्रवर्गाकरिता- ७.५%, इतर मागासवर्गीस प्रवर्गास -२७% व महिला लाभार्थ्यास-३०%, अपंग लाभार्थ्यांस-३% व अल्पसंख्याक गटास ५% लाभ आरक्षित आहे.

या योजनेत लाभ घेण्याकरिता व्यवसाय व लघु उद्योगाची यादी तयार करण्यात आली आहे काय?
  1. खनिज संपत्तीवर आधारीत उद्योग
  2. वन संपत्तीवर आधारित उद्योग
  3. कृषी व अन्न प्रक्रिया उद्योग
  4. पॉलीमर व रसायनांवर आधारीत उद्योग
  5. ग्रामीण आभियांत्रिकी तसेच अपारंपारिक उर्जेवर आधारीत उद्योग
  6. वस्त्रोद्योग
  7. सेवा उद्योग या व्यवसायाकरिता लाभ देण्यात येतो. तसेच मद्याशी संबंधित उद्योग, मांस, मच्छी, पशुपालन, वराहपालन, शेती लागवड, रिक्षा, टेम्पो, वाहन व्यवसाय, कुक्कुटपालन, पान-तंबाखू, गुटखा सारखे उत्पादन अथवा व्यवसाय, पर्यांवरण घातक असलेला कोणताही उद्योग अथवा व्यवसाय इ. व्यवसायाकरिता लाभ देण्यात येत नाही.
एखाद्या व्यक्तीने यापूर्वी शासनाच्या विविध योजनांतर्गत कर्ज घेतले असल्यास तो या योजनेचा लाभ घेण्यास पात्र आहे का?

यापूर्वी शासनाच्या एखाद्या कर्ज - अनुदानित योजनेचा लाभ घेतलेला असल्यास ती व्यक्ती किंवा त्याचे कुटुंब सदर योजनेचा लाभ घेण्यास पात्र ठरत नाही.

उद्योग संचालनालय , महाराष्ट्र शासन यांच्या मालकीच्या सामग्री शेवटचा बदल: ११.०२.२०१६