वर जा

सुधारित बीज भांडवल योजना (एसएमएस)

  • परिचय
  • पात्रता निकष
  • सांख्यिकी
  • सूचना
  • एफ.ए.क्यू

परिचय

सुशिक्षित बेरोजगारांना बीज भांडवल अर्थसहाय्य देण्याची योजना सन १९७२-७३ पासून अंमलात आहे. बेरोजगार व्यक्तींना उद्योग, सेवा उद्योग, व्यवसाय याव्दारे स्वयंरोजगार उभारण्यासाठी आवश्यक असलेले वित्तीय संस्थेकडील अर्थसहाय्य मिळविण्यासाठी बीज भांडवल उपलब्ध करून देणे हा या योजनेचा हेतू आहे.

शासन निर्णय, उद्योग , ऊर्जा व कामगार विभाग , क्र.इपीपी-२००७/(११९८)/उ-७ दिनांक १८ मे २००७ नुसार खालीलप्रमाणे धोरणात्मक बदल करण्यात आलेले आहेत:

  1. प्रकल्प मर्यादा ₹ २५.०० लाखा पर्यंत आहे.
  2. बीज भांडवल कर्जाची कमाल मर्यादा ₹ ३.७५ आहे.
  3. बँक कर्ज ७५ टक्के.
  4. रुपये दहा लाखांपेक्षा कमी प्रकल्प खर्च असलेल्या प्रकल्पांमध्ये बीज भांडवल कर्जाचे प्रमाण पुढीलप्रमाणे राहील:
    • सर्वसाधारण प्रवर्गातील लाभ धारकांसाठी - १५ टक्के.
    • अनु.जाती / जमाती, अपंग, विमुक्त व भटक्या जाती / जमाती आणि इतर मागासवर्गीय उमेदवारांना - २० टक्के.
  5. बीज भांडवल सहाय्यावर आकारावयाचे व्याज. बीज भांडवलाची रक्कम मृदु कर्ज (सॉफ्ट लोन) म्हणून द.सा.द.शे ६% व्याजाने देण्यात यावे.
  6. बीज भांडवल कर्जाच्या रक्कमेची विहित कालावधीत परतफेड करण्यात आली नाही तर थकित राक्कमेवर द.सा.द.शे. १ टक्के दंडनीय व्याज आकारण्यात येईल.
  7. बीज भांडवल कर्जाच्या रक्कमेची विहित कालावधीत परतफेड करणाऱ्या लाभार्थींना ३ टक्के रिबेट देण्यात येईल.
  8. शासन निर्णय , १५ सप्टेंबर २००३ अनुसार कर्जदाराने थकित मुद्दल व व्याज एकरक्कमी भरणा केल्यास त्यास दंडनीय व्याज माफ आहे. अशा प्रकरणांमध्ये द.सा.द.शे. १ टक्के दराने दंडनीय व्याज आकारण्यात येणार आहे व वरील व्याज पूर्वलक्षी प्रभावाने दिनांक १ ऑक्टोबर १९९३ पासूनच्या सर्व चालू प्रकरणांना लागू आहे.
  9. सदर योजना वाहन व्यवसाय, व्यापार व उद्योगांसाठी लागू आहे.
  10. कर्जाची परतफेड ७ वर्षांच्या आत करावयाची असून सुरुवातीची ३ वर्ष विलंबावधी (वाहनांसाठी ६ महिने) निश्चित करण्यात येईल.

पात्रता निकष

  • वयोमर्यादा १८ ते ५० वर्ष
  • कमीत कमी ७ वी पास
  • अर्जदार महाराष्ट्राचा किमान १५ वर्षांचा रहिवासी असावा.

सांख्यिकी

सर्व साधारण (₹ लाखात)
वर्ष नियतव्यय तरतुद खर्च उद्दिष्ट साध्य
२०११-१२ ८७१.२० ८७१.२० ८९६.४५ १४५२ १२५७
२०१२-१३ ३४५.५६ ८३३.०० ९९६.३९ १३८८ १४३०
२०१३-१४ ९८५.५७ ९८५.५७ ९८९.९९ १६४३ १३५६
२०१४-१५ ८७५.५० ११०९.२५ ११११.५० १८५२ १२४९

विशेष घटक योजना (₹ लाखात)
वर्ष नियतव्यय तरतुद खर्च उद्दिष्ट साध्य
२०११-१२ २५८.४० २५८.४० २३२.५६ ४३१ ३७०
२०१२-१३ ४४५.५० ४४५.५० ३८४.२४ १००० ५१५
२०१३-१४ ३८६.०४ ३८६.०४ ३८१.१४ ६४३ ४९९
२०१४-१५ ४७०.५० ४७०.५० ४३३.९४ ७८६ ५०५

आदिवासी उपयोजना (जनजाती क्षेत्रांतर्गत) (₹ लाखात)
वर्ष नियतव्यय तरतुद खर्च उद्दिष्ट साध्य
२०११-१२ २४.१० २४.१० २०.३५ ४१ ५८
२०१२-१३ २२.७० २२.७० १९.१५ ३९ ५२
२०१३-१४ २४.१५ २४.१५ १८.५८ ४१ ६६
२०१४-१५ २६.२६ २६.२६ १८.१९ ४४ ५५

आदिवासी उपयोजना (जनजाती क्षेत्राबाहेरील) (₹ लाखात)
वर्ष नियतव्यय तरतुद खर्च उद्दिष्ट साध्य
२०११-१२ १५.२५ १५.२५ १२.६१ २७ ४९
२०१२-१३ १२.१० ११.५० १०.४९ २१ ३१
२०१३-१४ १५.७० १५.७० १५.७० २८ ३५
२०१४-१५ १७.०४ १७.०४ ९.३४ २९ २६
शासन निर्णय आणि सूचना
सुधारित बीज भांडवल योजना शा.नि २००७ - १८.०५.२००७ तपशील पहा
सुधारित बीज भांडवल योजना २००३ - १५.०९.२००३ तपशील पहा
सुधारित बीज भांडवल योजना १९९३ - ३०.०९.१९९३ तपशील पहा

एफ.ए.क्यू - सुधारित बीज भांडवल योजना (एसएमएस)


शासन सुशिक्षित बेरोजगारांसाठी बरेच काही करते असे नेहमी वर्तमानपत्रात वाचावयास मिळते.ही योजना म्हणजे नक्की काय आहे?

सुशिक्षित बेरोजगार व्यक्तींना त्यांचा स्वत:चा उद्योग,सेवाउद्योग, व्यवसाय याव्दारे उभारण्यासाठी आवश्यक असलेले वित्तीय संस्थेकडील अर्थ सहाय्य मिळविण्यासाठी स्वत:चे बीज भांडवल उभे करण्याइतकी आर्थिक कुवत असतेच असे नाही. हे बीज भांडवल उभे करण्यासाठी प्रकल्प खर्चाच्या १५ % ते २०% बीज भांडवल उपलव्ध करून देण्याचा या योजनेचा हेतू आहे. सुशिक्षित बेराजगारांना बीज भांडवल अर्थसहाय्य देण्याची योजना १९७२-७३ पासून अंमलात आहे. या योजनेमध्ये सुधारणा करून १९९३ पासून नविन योजना लागू करण्यात आली आहे. सुशिक्षित बेरोजगार व्यक्तींनी नोकऱ्या मिळविण्याच्या मागे न लागता स्वयंरोजगाराच्या संधी शोधण्यात व त्यायोगे इतरांना आपल्या प्रकल्पात रोजगार मिळवून द्यावा हा सदर योजनेमागील शासनाचा हेतू आहे.

या योजनेचा लाभ घेण्‍यास कोण पात्र ठरतात? तसेच बीज भांडवलाची मर्यादा व त्यातील उद्योजकांचा सहभाग याबाबत मार्गदर्शन होईल का?

१८ ते ५० वर्ष या वयोगटातील कमीत कमी ७ वी पास तसेच महाराष्ट्राचा किमान १५ वर्षांचा अधिवास असणारी स्थानिक व्यक्ती या योजनेचा लाभ मिळण्यास पात्र ठरतात. अर्जदाराच्या अंगभूत अशा विशेष कला कौशल्याच्या आधारावर शैक्षणिक पात्रता शिथिल करण्याचे अधिकार उद्योग संचालनालयाच्या विभागीय अधिकाऱ्यांना प्रदान केलेले आहेत. वरील पात्रतेखेरीज सेवायोजना कार्यालयात नोकरीसाठी नांव नोंदविलेले असणे आवश्यक आहे. नोकरी करणारा उद्योजकही बीज भांडवलासाठी अर्ज करू शकतो. परंतू बीजभांडवल वाटपापूर्वी त्याने नोकरीचा राजिनामा देणे व तसे मालकाकडून हमीपत्र आणणे आवश्यक आहे. तसेच व्यवसाय करीत असलेला, पूर्वी व्यवसाय केलेला परंतू सध्या व्यवसाय बंद असलेला उमेदवार या योजनेअंतर्गत सुशिक्षित बेरोजगार समजला जात नाही.

शासन निर्णय, उद्योग, ऊर्जा व कामगार विभाग , क्र.इपीपी-२००७/(११९८)/उ-७ दिनांक १८ मे २००७ नुसार खालीलप्रमाणे धोरणात्मक बदल करण्यात आलेले आहेत:

  1. रुपये दहा लाखांपेक्षा कमी प्रकल्प खर्च असलेल्या प्रकल्पांमध्ये बीज भांडवल कर्जाचे प्रमाण पुढीलप्रमाणे राहील:
    • सर्वसाधारण प्रवर्गातील लाभ धारकांसाठी - १५ टक्के.
    • अनु.जाती / जमाती, अपंग, विमुक्त व भटक्या जाती / जमाती आणि इतर मागासवर्गीय उमेदवारांना - २० टक्के.
  2. प्रकल्प मर्यादा ₹ २५.०० लाखा पर्यंत आहे.
  3. बीज भांडवल कर्जाची कमाल मर्यादा ₹ ३.७५ आहे.
  4. बँक कर्ज ७५ टक्के.
या योजनेमध्ये व्याजाचा दर किती आहे?

बीज भांडवल सहाय्यावर बीज भांडवलाची रक्कम मृदू कर्ज (सॉफ्ट लोन) म्हणून द.सा.द.शे. ६% व्याजाने देण्यात येते.

बीज भांडवल कर्जाच्या रक्कमेची विहित कालावधीत परतफेड करण्यात आली नाही तर थकित रक्कमेवर द.सा.द.शे. १ % दंडनीय व्याज आकारण्यात येईल.

बीज भांडवल कर्जाच्या रक्कमेची विहित कालावधीत परतफेड करणाऱ्या लाभार्थींना व्याजाच्या रक्कमेत ३ टक्के रिबेट देण्यात येईल.

या योजनेचा लाभ घेण्‍यासाठी अर्ज कोठे व कसा करावयाचा आहे? तसेच बीज भांडवल उद्योजकांपर्यंत कशा तऱ्हेने पोहोचते?

योजनेचा लाभ घेऊ इच्छिणाऱ्यांनी बीज भांडवलासाठीचा विहित नमुन्यातील अर्ज जिल्हास्तरावर जिल्हा उद्योग केंद्र कार्यालयाकडे करावा. तसेच मुंबई व मुंबई उपनगरे येथील अर्जदारांनी उद्योग सह संचालक (मुंप्रावि), चुनाभट्टी , मुंबई या कार्यालयात अर्ज उपलब्ध होतील.

बँकेने मंजूर केलेल्या प्रकरणातील बीज भांडवलाची रक्कम जिल्हा उद्योग केंद्र कार्यालयांकडून बँकेमार्फत लाभार्थींना वितरित करण्यात येईल.लाभार्थीनिहाय लेखे ठेवण्याचे व वसुली करण्याचे सर्व काम जिल्हा उद्योग केंद्र कार्यालयाकडून केले जाईल.

बीज भांडवल कर्जाची परतफेड कशा पध्दतीने केली जाईल?

बीज भांडवल कर्जाच्या परतफेडीचा कालावधी एकूण ७ वर्षांचा असून त्यामध्ये सुरुवातीचा तीन वर्षाचा विलंबावधी समाविष्ट राहील. म्हणजेच बीजभांडवल मिळल्यापासून तीन वर्षानंतर परतफेड सुरु होईल व तो ७ वर्षामध्ये पूर्ण होईल. विलंबावधीतील संचित व्याजाची रक्कम विलंबावधीनंतर एक रक्कमी वसूल केली जाईल. उर्वरित चार वर्षांच्या कालावधीमध्ये मुद्दल व व्याजाची रक्कम वार्षिक हप्त्यामध्ये वसूल केली जाईल. वाहतुक व्यवसायासाठी / व्यापार व सेवा उद्योग – विलंबावधी कालावधी ६ महिने राहील.

परस्पर बँक/वित्तीय संस्था यांजकडून अर्ज मंजूर करवून आणल्यावर बीज भांडवल नाकारले जातेका?

अर्जदाराने परस्पर बँक/वित्तीय संस्था यांजकडून अर्ज मंजूर करुन घेतल्यानंतर बीज भांडवल नाकारले जाते ते काही विशिष्ठ परिस्थितीत, अर्ज शक्यतो जिल्हा उद्योग केंद्रामार्फतच करावा, अशी अपेक्षा आहे. परस्पर बँक/वित्तीय संस्था यांजकडून आलेले अर्ज जिल्हा उद्योग केंद्राकडे आल्यास जिल्हा उद्योग केंद्र त्याच वर्षात मंजूर झालेल्या अर्जांचा विचार करून बीजभांडवल उपलब्ध करून देईल.

व्यवसाय प्रकल्पाकरिता प्रकल्पात जमीन, इमारत वगैरेचा समावेश करता येतो का?

या योजनेत प्रकल्प खर्चाची मर्यादा २५ लाख आहे. प्रकल्प खर्चाच्या आकारात स्थिर भांडवली गुंतवणूक (जमीन, इमारत,संयंत्र) तसेच सीमांतिक खेळते भांडवल अंतर्भूत राहील. तथापि वाहतूक व्यवसायामध्ये खेळत्या भांडवलाचा समावेश प्रकल्प खर्चात करता येणार नाही.

व्यवसाय प्रकल्पाकरिता कोणकोणत्या बाबींचा समावेश करता येतो?

या योजनेत कोचिग क्लासेस, गॅस एजन्सी,मंगल कार्यालय यासारख्या प्रकल्पात जमीन इमारत वगळून इतर स्थिर भांडवलाच्या बाबींकरिता बीजभांडवल देता येते. स्टेशनरी खरेदी,डिपॉझिट, पगार,फोन, भाडे वगैरे करिता बीजभांडवल देता येणार नाही.

कोणते प्रकल्प बीजभांडवल सहाय्याकरिता मान्य केले आहेत?

या योजनेत:

  1. लघुउद्योग, लघु सेवा व व्यवसाय (उद्योगासंबंधी) उपक्रम, महाराष्ट्र लघु उद्योग या प्रवर्गांतर्गत नोंदणीस पात्र असे उद्योग व सेवा उद्योग
  2. घाउक व किकोळ विक्री व सेवा व्यवसायासाठीचे उपक्रम
  3. वाहतुक व्यवसाय
  4. वैद्यकीय व्यवसाय व आरोग्य सेवा
  5. कृषि, पशु संवर्धन, दुग्ध व्यवसाय, मत्स्य व्यवसाय इ. बाबींशी संलग्न सेवा व व्यवसाय उपक्रम
उद्योग संचालनालय , महाराष्ट्र शासन यांच्या मालकीच्या सामग्री शेवटचा बदल: ११.०२.२०१६