आजारी मोठया उद्योगांचे पुर्नवसनकरण्याकरिता आजारी औद्योगिक कंपन्या (विशेष तर तुदी ) अधिनियम १९८५ च्या तरतुदीनुसार केंद्र शासनाने औद्योगिक व वित्तीय फेररचना मंडळ (बी आय एफ आर) ची स्थापना केली आहे.
तोटयात गेलेल्या घटकाने औद्योगिक व वित्तीय फेररचना मंडळा कडे संपर्क साधल्यास त्याच्या अर्जाच्या छाननीनुसार योग्य वाटल्यास कंपनीला आजारी घोषित करुन मंडळाकडून प्रातिनिधीक संस्थेची नेमणूक करण्यांत येते. बी आय एफ आर खंडपीठाने कंपनीला पुर्नवसन योजना मंजुर केल्यास राज्यशासन पत्र क्र.बी आय एफ आर-१०८९ (११११) /आय एन डी -१०ए, दिनांक १७.१०.१९९० वसुधारीत पत्र दिनांक १९.९.१९९२ अन्वये देण्यात येणा –या स्टॅडर्ड पॅकेज अंतर्गत तसेच शासनपत्र क्र.एस युसी-२००७/(१/०७)/उद्योग-१०, दिनांक ३०.३.२००७ नुसार पुढील प्रमाणे सवलती देते.
आजारी मोठ्या उद्योगांचे पात्रतेचे निकष:
आजारी मोठ्या उद्योगांचे पुनर्वसन करणे करीता आजारी औद्योगिक कंपन्या (विशेष तरतूदी)अधिनियम १९८५ च्या तरतूदीनुसार केंद्र शासनाने औद्योगिक व वित्तिय फेर रचनामंडळ (बीआयएफआर) ची स्थापना केली आहे.
तोट्यात गेलेल्या घटकाने औद्योगिक व वित्तिय फेर रचना मंडळाकडे संपर्क साधल्यास त्याच्या अर्जाच्या छाननीनुसार योग्य वाटल्यास कंपनीला आजारी घोषित करून मंडळाकडून प्रतिनिधिक संस्थेची नेमणूक करण्यात येते. बीआयएफआर खंडपीठाने कंपनीला पुनर्रवसन योजना मंजूर केल्यास राज्य शासनामार्फत शासन पत्र क्र.बीआयएफआर-१०८९ (११११) /आयएनडी -१०ए, दिनांक १७.१०.१९९० व सुधारीत पत्र दिनांक १९.९.१९९२ अन्वयेदेण्यात येणा-या स्टॅडर्ड पॅकेज तसेच शासन पत्र क्र.एसयुसी-२००७/(१/०७)/उद्योग-१०, दिनांक ३०.३.२००७ नुसार सवलती दिल्या जातात.
शासन निर्णय आणि सूचना | |
Circular - Special Amnesty Scheme-Sick Units २०१३-२०१४ | तपशील पहा |
GR Special Amnesty Scheme-Sick Units ०२.०५.२०१३ | तपशील पहा |
Corrigendum Special Amnesty Scheme for Sick Units ०१.०७.२०१३ | तपशील पहा |
GR Special Amnesty Scheme for Sick Units Modifications ०१.०८.२०१३ | तपशील पहा |
GR Special Amnesty Scheme for Sick Units Extension Period for Scheme १४.०८.२०१४ | तपशील पहा |
GR Standard Package of Government for units under BIFR १४.०५.१९९६ | तपशील पहा |
GR Standard Package for units referred to BIFR १७.१०.१९९० | तपशील पहा |
आजारी उद्योग असल्याबाबतची व्याख्या(भारतीय रिझर्व बँकेच्या सुधारीत मार्गदर्शक तत्वानुसार):
किंवा
आणि
वित्तीय सहाय्य करणारी संस्थेने आजारी उद्योग असल्याचे घोषित केल्यास जिल्हा उद्योग केंद्र अशा उद्योगास प्रमाणपत्र निर्गमित करते.
पाच वर्षाकरिता.
लघु आजारी उद्योग म्हणून वित्तीय सहाय्य करणाऱ्या वित्तीय संस्था/बँका यांनी बनविलेल्या पुर्नरुज्जीवन योजनेत राज्य शासनातर्फे शुश्रुषा कार्यक्रम अंमलात येण्याच्या दिनांकाच्या दिवशी राज्य शासनाची सर्व देण्याची थकबाकीची मूळ रक्कम, व्याज व दंडनीय व्याजासह आजारी उद्योग घटकाने ६० मासिक हप्त्यामध्ये व त्यावरील ७ टक्के व्याजाने परतफेड करण्याच्या योजनेचा लाभ मिळतो.
जसे की विक्रिकर, महाराष्ट्र राज्य विद्युत महामंडळ इत्यादी कार्यालयाची थकीत देणी.
ज्या उद्योग घटकांचे पुर्न:जीवन शक्य नाही अशा घटकांना औद्योगिक व्यवसायातून सुलभरित्यागमनहोण्याच्या दृष्टीने शासनाने जे घटक पुनरुज्जीवन क्षमनाहीत/बंद आहेत अशा घटकांना बाहेर पडण्यासाठीविशेष अभय योजना वेळोवेळी कार्यान्वित केली आहे.
बंद घटकांची स्थिर भांडवली मालमत्ता सदर उद्योग सुरु करण्यासाठी किंवा त्याठिकाणी नवीन उद्योग सुरु करण्यासाठी वापरात आणण्यास उत्तेजन देण्याकरिता.
शासन निर्णयान्वये पात्रतेच्या अटी व शर्ती आणि निकषांची पूर्तता करणा-या बंद लघु अथवा मोठया उद्योग घटकाने राज्य शासनाची सर्व मुद्दलाची रक्कम एक रकमी भरल्यास व्याज व दंडव्याज माफ केले जाते.
बेकारीस प्रतिबंध करण्यासाठी किंवा बेकारीचे निवारण करण्यासाठी उपाय योजना म्हणून विवक्षित औद्योगिक उपक्रमचालविणे किंवा तेचालविण्यासाठी कर्ज देणे, हमीदेणे किंवा वित्तीय सहाय्यदेणे राज्यशासनासशक्यव्हावेयासाठी मुंबई सहाय्यक उपक्रम (खास उपबंध) अधिनियमांतर्गत औद्योगिक घटकास सहाय्यक उपक्रम घोषित करण्याची तरतूद आहे.
सहाय्यक उपक्रमांचा कालावधी एका वेळी बारा महिन्यापेक्षा अधिक असत नाही.
विहितनमुन्यातीलअर्जनसून, २१ मुद्दयांबाबतच्या प्रश्नावलीत शासनाकडे प्रस्ताव सादर करावे लागतात.
शासना कडून प्राप्त होणाऱ्या प्रस्तावानुसार, उद्योग संचालनालय प्रस्तावाची छाननी /तपासणी करुन संबंधित उद्योग घटक सहाय्यक उपक्रम म्हणून घोषित करणे योग्यहोईल्किंवा नाही या बाबत संचालनालय शासनास स्वयंस्पष्ट शिफारस अभिप्राय कळविते.